लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : घरफोडी करून दागिने व रोकड अशा एकूण ६२ हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी केल्याप्रकरणी एकास ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने गुरुवारी दिले.मंजू कृष्णा श्रीराम (वय ३२, रा. कुरुळी सोनवणेवस्ती, पुणे-नाशिक हायवे) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी संतोष राजासिंग ठाकूर (वय ४१, रा. महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, बुधवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीकडून दागिने मिळाले असले तरी रोख २० हजार रुपयांबाबत त्याने काही सांगितलेले नाही. ती रक्कम काय केली, याचा तपास करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरत त्याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.दागिने हस्तगतहा प्रकार ११ मार्च रोजी फिर्यादीच्या घरी, महालक्ष्मी कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर ३२१ येथे सकाळी साडेदहा ते दुपारी ४ या वेळेत घडला.दुपारी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने दरवाजाची कडी उचकटून आत प्रवेश केला. लोखंडी कपाटाचा दरवाजा फोडून त्याचे नुकसान केले. लॉकरमधील १० हजार किमतीची सोन्याची अंगठी, पाच ग्रॅमची सोन्याची साखळी, पाच ग्रॅमच्या सहा अंगठ्या, १० हजार किमतीचे दोन डूल व २० हजाराची रोकड असा एकूण ६२ हजाराचा मुद्देमाल चोरला. त्यातील दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
घरफोडीप्रकरणी एकास पोलीस कोठडी
By admin | Published: June 02, 2017 2:44 AM