शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

हिंदू जनगर्जना मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंचरमध्ये पोलिसांचे पथसंचलन; शांतता राखण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 12:31 PM

दुपारी होणाऱ्या हिंदू जनगर्जना मोर्चाच्या अनुषंगाने सकाळी पोलिसांनी मंचर शहरातून पथसंचलन केले...

मंचर (पुणे) : शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारी होणाऱ्या हिंदू जनगर्जना मोर्चाच्या अनुषंगाने सकाळी पोलिसांनीमंचर शहरातून पथसंचलन केले. लव जिहाद, गोहत्या, धर्मांतर याकडे लक्ष वेधण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मंचर शहरासह परिसरातील गावांमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

मंचर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. या बंदला पाठिंबा देत तालुक्यातील अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक  मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारतळ, श्रीराम मंदिर, अवलिया दर्गा, छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे पोलिसांनी सकाळी पथसंचलन केले.

पथसंंचालनाच्या वेळी 2 पोलीस उपअधीक्षक, 4 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक 6 पोलीस उपनिरीक्षक, 60 पोलिस अंमलदार, 10 महिला अंमलदार, 50 होमगार्ड, 1 आरसीपी पथक जुन्नर, 1 एस आर पी एफ कंपनी यांनी सहभाग घेतला. सकाळी 10 ते 11 या दरम्यान पथसंचलन करण्यात आले.

दुपारी होणाऱ्या मोर्चाचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार असून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ड्रोन कॅमेऱ्याने सर्व मोर्चावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्व वाहनांचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याने सर्व नागरिकांनी शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMancharमंचरPoliceपोलिस