ग्रामीण भागात गावातील कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष ठेवून पोलिसांना सहकार्य करताना दोन गटांतील वादात मात्र निपक्ष भूमिका घेताना अनेकदा पोलीस पाटलांना शिवीगाळ, मारहाण, धमक्या देण्याच्या घटना घडत असतात. पोलीस पाटील हा शासनाचा शेवटचा तळागाळात गावपातळीवर कार्यरत असताना गटातटात आपसात होणाऱ्या वादावादीत पोलीस स्टेशनपर्यंत येणाऱ्या तक्रारी,एनसी आदींबाबत पोलीस पाटील गावपातळीवर सलोखा ठेवून काम करीत असतो.
मात्र, अनेकदा रोषाला सामोरे जाण्याची वेळ पोलीस पाटलावर येत असे. याबाबत राज्यात अनेकदा मारहाणीच्या घटना घडत असताना पोलिसांना शासकीय कामात सहकार्य करणारा पोलीस पाटलांना कायद्याचे संरक्षण मिळावे यासाठी पोलीस पाटील संघटनेने वेळोवेळी शासन दरबारी मागणीचा पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल महाआघाडी सरकारने घेतल्याबद्दल पोलीस पाटलांनी या निर्णयाचे स्वागत केल्याची माहिती पुणे जिल्हा महिला संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती मांडेकर यांनी केले आहे.
राज्यातील महाआघाडी सरकारच्या गृह विभागाने पोलीस पाटलांवर होणाऱ्या विविध प्रकारच्या मानसिक,शारीरिक घटनाबाबत आढावा घेत यापुढे मारहाण झाल्याची घटना घडल्यास सरकारी कामात अडथळा आणण्याचा संबधिता विरोधात आजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याबाबतचे स्वतंत्र आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकाना निर्गमित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्यात पोलीस पाटील पदावर महिला आता गावपातळीवर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडत असताना अनेकदा महिलांना गावकारभारात महत्वाचे स्थान मिळाल्याने काही मंडळी विनाकारण त्रास देत असतात, मात्र या कायद्यामुळे मात्र निश्चितच महिलांना काम करताना संरक्षण मिळाले आहे. - तृप्ती मांडेकर ,पोलीस पाटील,आंबेठाण.
०६ चाकण
गृह राज्यमंत्र्यांचे अभिनंदन करताना पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी.