पुणे : पोलिसांची प्रतिमा सुधारायची असेल तर जनतेशी संवाद वाढला पाहिजे आणि त्यांच्यात पोलिसांप्रती विश्वास निर्माण झाला पाहिजे. पोलीस हे '''''''' कॉमन मॅन'''''''' साठीच आहेत. त्यांचे रक्षण करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. याची जाणीव पोलिसांना असली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल यांनी केले.
पोलीस संशोधन केंद्र येथे '''''''' पोलीस वस्तू संग्रहालय'''''''' आणि कॉमन मॅन पोलीस मैत्री शिल्पाचे उद्घाटन जायसवाल यांनी शुक्रवारी (दि. २०) केले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी निवृत्त पोलीस महासंचालक वसंत सराफ लिखित ‘पोलीस नेतृत्वाची कला’, निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याळ लिखित ‘गुणवत्तापूर्ण तपासाची चेकलिस्ट’ आणि विशेष सरकारी अभियोक्ता अँड शिशिर हिरे लिखित ‘आर्थिक गुन्हे का? कसे? उपाय’ या पुस्तकांचे तसेच महाराष्ट्र पोलीस जर्नलचे प्रकाशन करण्यात आले. अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजय कुमार, अपर पोलीस महासंचालक (गुन्हे अन्वेषण) अतुलचंद्र कुलकर्णी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आदी उपस्थित होते.
जायसवाल म्हणाले, कोविड काळात पोलिसांनी केलेल्या कामाचे समाड्च्या सर्व स्तरातून कौतुक झाले. स्वतःमध्ये बदल घडवायचा तर सर्वप्रथम जनतेकडे पाहण्याच्या स्वतःच्या दृष्टीकोनात बदल करणे आवश्यक आहे.
“पोलीस जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. आर. के. लक्ष्मण जरी राजकीय व्यंगचित्रांसाठी प्रसिद्ध असले तरी पोलिसांच्या जनतेकडे पाहण्याच्या दृष्टोकानावर त्यांनी निरीक्षणातून उत्तमपणे भाष्य केले आहे. आर. के लक्ष्मण यांच्या जन्मशताब्दी निमित्त पोलीस आणि ‘कॉमन मॅन’ला दिलेला हा सन्मान आहे,” असे लक्ष्मण म्हणाल्या.
अँड शिशिर हिरे म्हणाले की, जमिनीच्या व्यवहारात आर्थिक फसवणुकीचे मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडतात. हे गुन्हेगार ग्लोरिफाय केले जातात. गुन्हेगारांचे सामाजिक दैवतीकरण केले जात आहे. नवी पिढी त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहते हेच मोठे आव्हान आहे. पुस्तकाविषयी मुत्याळ म्हणाले, “पुस्तकात 17 प्रकारच्या गुन्ह्यांची चेकलिस्ट आहे. पाच वर्षांच्या अभ्यासातून चेकलिस्ट करणे महत्वाचे आहे असे वाटले. हे पुस्तक खास करून अंमलदारासाठी लिहिले असून, सर्व पोलीस स्टेशनला हे पुस्तक विनामूल्य देणार आहे.” शिरीष सरदेशपांडे यांनी आभार मानले.