सांगवी: पणदरे (ता. बारामती) येथे अवैधरीत्या दारूविक्री करणाऱ्या चार जणांवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी कारवाई करून मुद्देमाल जप्त केला आहे.
कर्वेश चंदर भोसले (रा. गीतानगर, पणदरे, ता. बारामती, जि. पुणे), विजया कर्वेश भोसले (रा. गीतानगर, पणदरे, ता. बारामती, जि. पुणे), सोनाली महेश भोसले (रा. गीतानगर, पणदरे, ता. बारामती, जि. पुणे), राजेश सतू राखपसरे (रा.अशोकनगर, पणदरे ता. बारामती, जि. पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. शनिवारी (दि. २६) रोजी दारू अड्ड्यावर छापे टाकून जप्त करण्यात आलेल्या कारवाईत देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आणि गावठी हातभट्टीची तयार दारू असा एकूण ४ हजार २३४ रुपयांचा अवैध दारूचा माल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश कवितके, पोलीस हवालदार महेश पन्हाळे, पोलीस नाईक अनिल खेडकर, पोलीस नाईक कल्याण खांडेकर, पोलीस कॉन्स्टेबल हिरालाल खोमणे, गणेश लोखंडे, गोपाळ जाधव, महिला पोलीस रजनी कांबळे यांच्या पथकाने पणदरे दूरक्षेत्र हद्दीत कारवाई करून अवैध दारू जप्त करण्यात आली आहे.
पणदरेत दारू अड्ड्यावर कारवाई दरम्यान जप्त केलेला मुद्देमाल.
२७०६२०२१-बारामती-०५