राजगुरुनगर : पिंपरी बुद्रुक (ता. खेड ) येथे जुगार अड्डयावर खेड पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेऊन १३ हजारांचा मुद्देमाल हस्तगस्त केला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल रामदास शंकर बो-हाडे खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी बुद्रुक येथे गावातील व्यायामाचे खोलीचे भिंतीचे आडोशाला दिपक ज्ञानेश्वर कोळेकर ( वय ३० रा. लादवड ता.खेड ), अनिल दिनकर ठाकुर (वय ४२ ), सचिन बालु ठाकुर ( वय ३५ ),मयुर सोपान ठाकुर ( वय ३२ ) रा. पिंपरी बु ता. खेड ),राजेंद्र विष्णू नानेकर (वय ५० रा. नानेकरवाडी ता.खेड ) हे तीन पत्ती नावाचा जुगार पैशावर खेळत होते.
खेड पोलिसांनी छापा मारून रोख रक्कम व जुगारीचे साहित्य असा एकूण १२ हजार ९०० रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलिस हवालदार संतोष घोलप करीत आहे.