कळस : इंदापूर तालुक्यातील चिखली व लासुर्णे येथे अवैध वाळु उपसा करणाऱ्यांवर वालचंदनगर पोलिसांनी छापा टाकत वाळू वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेतली. या कारवाईत २७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथे निरा नदीच्या काठावर तसेच लासुर्णे गावचे हद्दीतुन चिखली फाटा येथुन चोरून वाळु उपसा होत असल्याची गोपनीय माहिती वालचंदनगर पोलीस स्टेशनला मिळाली होती. याबाबत सहाय्य पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे,हवालदार प्रकाश माने यांच्या पथकाला सूचना केल्या होत्या मंगळवारी पहाटे चिखली व लासुर्णे या ठिकाणी छापे टाकुन या पथकाने मुद्देमाल जप्त केला आहे. असा एकूण २७,२५०००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत उमाजी मारुती खोमणे (रा. लासुर्णे, चिखली फाटा ता. इंदापुर), अंकुश रामचंद्र जोगदंड (रा . सणसर तालुका -इंदापूर )व अज्ञात ३ वाहनाचे चालक किंवा मालक. यांचेवर वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये पर्यावरण अधिनियम कलम ३,५ सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कलम ४, गौन खानिज कायदा कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण अभिनव देशमुख अपर पोलीस अधिक्षक बारामती मिंलीद मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे हे करीत आहे.