शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

पोलिसांना वेतनवाढ; शिफारसी सादर, सातव्या वेतन आयोगाच्या शिपाई ते निरीक्षक पदांच्या वेतनश्रेणी ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 5:47 AM

सातव्या वेतन आयोगासाठी राज्य पोलीस दलातील अधिकारी व कर्मचा-यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी व त्यांच्यातील आर्थिक न्यूनगंड कमी होण्यास व कामातील उत्साह वाढविण्यास मदत होईल, अशी घसघशीत वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांना सादर करण्यात आला असून, त्यात पोलीस शिपाई ते निरीक्षक पदाच्या वेतनश्रेणी ठरविण्याच्याही शिफारसी सादर करण्यात आल्या आहेत.

- विवेक भुसेपुणे : सातव्या वेतन आयोगासाठी राज्य पोलीस दलातील अधिकारी व कर्मचा-यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी व त्यांच्यातील आर्थिक न्यूनगंड कमी होण्यास व कामातील उत्साह वाढविण्यास मदत होईल, अशी घसघशीत वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांना सादर करण्यात आला असून, त्यात पोलीस शिपाई ते निरीक्षक पदाच्या वेतनश्रेणी ठरविण्याच्याही शिफारसी सादर करण्यात आल्या आहेत.केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्रीय कर्मचाºयांना वेतन देण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातील पोलीस दलामधील शिपाई ते निरीक्षक या पदावरील अधिकारी, कर्मचारी यांच्या वेतनमध्ये सुधारणा करण्यासाठी बिनतारी विभागातील पोलीस निरीक्षक डी़ एस़ इंगळे व राज्य राखीव पोलीस दलातील निरीक्षक आऱ के. आळेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.पोलिसांची वेतनश्रेणी निश्चित करताना या समितीने महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यातील पोलीस दलाचे वेतनाचाही अभ्यास केला़ या तुलनात्मक तक्त्याचा विचार करता सेवाप्रवेशावेळी महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई हा इतर राज्यातील पोलीस शिपाई पदावरील कर्मचाºयांपेक्षा मूळ वेतन व स्थूल वेतन दोन्हीही कमी घेत आहे़सध्या राज्यातील दर एक लाख लोकसंख्येमागे पोलीस दलाचा विचार केल्यास राज्यातील पोलीस दलावर कामाचा अतिरिक्त ताण असल्याचे लक्षात येते़ महाराष्ट्रात दर एक लाख लोकसंख्येमागे केवळ १५३ पोलीस कर्मचारी असून, भौगोलिकदृष्ट्या लहान असलेल्या राज्यामधील पोलिसांची संख्या लक्षात घेता महाराष्ट्रातील पोलीस दल अत्यंत तोकडे आहे़ तसेच महाराष्ट्रातील पोलीस दलाला ज्या परिस्थिती काम करावे लागते, ते पाहता त्यांच्या वेतनात वाढ करण्याची आवश्यकता असल्याची शिफारस यामध्ये करण्यात आली आहे़सहायक पोलीस निरीक्षक यांना महसूल विभागातील अपर तहसीलदार या पदाशी समकक्ष पद असल्याने वरिष्ठ ५००० ग्रेड वेतनातील ६ वा टप्पा कमीतकमी वेतन प्रस्तावित केले आहे़ पोलीस हवालदार यांना २८०० ग्रेड वेतनातील ६ वा टप्पा कमीतकमी वेतन प्रस्तावित केले आहे़ याशिवाय वेगवेगळ्या पदावरील कर्मचाºयांच्या मूळ वेतनात वाढ देण्याची शिफारस करण्यात आली आहे़ पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना विशेष शाखेच्या अनुषंगाने प्रोत्साहनपर देय मूळ वेतनांपेक्षा मिळणाºया अतिरिक्त वेतनाची आकारणी केंद्र शासनाने घरभाडे भत्ता आकारणीसाठी जे गुणक वापरले आहे़, त्या गुणकानुसार प्रस्तावित केली आहे़या शिफारशीमध्ये श्वान शिक्षक, पोलीस निरीक्षक, मोटार परिवहन विभाग, अंगुलीमुद्रा, पोलीस निरीक्षक बिनतारी यांना महसूल विभागतील तहसीलदार या पदाशी समकक्ष असल्याने त्यांना ५४०० ग्रेड वेतनातील ६ वा टप्पा कमीतकमी वेतन म्हणून प्रस्तावित करण्यात आला आहे़राज्य मूळ वेतन वाढीव वेतनाची स्थूल वेतन वाढीव वेतनाचीटक्केवारी टक्केवारीमहाराष्ट्र ७२०० ़़़़़़़़ २१०७८ ़़़़पंजाब १३५०० ४७ ३४८८५ ४०केरळ १२२०० ४१ ३२२०८ ३५राजस्थान ९८४० २६ २७२४१ २३आंध्र प्रदेश १६४०० ५६ २५८७४ १९तेलंगणा १६४०० ५६ २३८४५ १२

टॅग्स :Policeपोलिस