पुणे - पुणे शहर पोलीस दलातील २१३ पोलीस शिपाईपदांसाठी सोमवारपासून शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी सुरू होत आहे़ त्यासाठी ४० हजार ३१५ पुरुष, तर सुमारे ८ हजार ७३५ महिलांनी अर्ज भरले आहेत़याबाबत मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी सांगितले, की पोलीस भरतीसाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे़ शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात दररोज अडीच हजार जणांची चाचणी होणार आहे़ या उमेदवारांना त्यांच्या शारीरिक व मैदानी चाचणीचा दिनांक व वेळ महाआॅनलाईन मुंबईमार्फत कळविण्यात आली आहे़ पहिल्या दिवशी रजिस्टेशन व कागदपत्रांची तपासणी, दुसºया दिवशी चार मैदानी चाचण्या आणि तिसºया दिवशी बालेवाडी येथे १६०० मीटरधावण्याची चाचणी होणार आहे़ ही चाचणी सकाळी ६ वाजल्यापासून ११ ते १२ वाजेपर्यंत चालणार आहे़६ एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया सुरूराहणार आहे़शिवाजीनगर मुख्यालयात चाचणीशिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर या चाचणी होणार असून येणाºया उमेदवारांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे़ या भरतीसाठी असंख्य तरुण हे ग्रामीण भागातून आलेले असतात़ अनेक जण रात्री पुण्यात येतात़त्यातील अनेकांच्या जेवणाची सोय नसते़ अशा उमेदवारांसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन फूड पॅकेज देणार असतील, तर त्यांचे स्वागत केले जाईल, असे उपायुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी सांगितले़
पोलीस भरती आजपासून सुरू, शहर दलात २१३ पदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 6:35 AM