पुणे : पोलीस दलात सुधारणा करण्यासाठी सूचना झाल्या, आयोगाची निर्मिती झाली, प्रत्यक्षात सूचना, सुधारणा कागदावरच राहिल्या. पोलीस दलात सुधारणा करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत निवृत्त पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांनी व्यक्त केले.डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात ‘पब्लिक कन्सर्न फॉॅर गव्हर्नन्स ट्रस्ट’च्या सहकार्याने ‘बेटर पोलिसिंग’या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, या प्रसंगी ते बोलत होते. उत्तर प्रदेश पोलीस दलाचे निवृत्त महासंचालक प्रकाश सिंग यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रोहिणी होनप ,एस. सी. नागपाल, सत्यबीर दोड, ए. व्ही. कृष्णन आदी उपस्थित होते.उमराणीकर पुढे म्हणाले, की समाजात पोलीस नेहमीच टीकेचा विषय ठरला आहे. मात्र, पोलिसांना अनेक पातळ्यांवर काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या समस्या जाणून घेणे आवश्यक आहे.सिंग म्हणाले, की कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याबरोबर दहशतवाद, नक्षलवाद, अंमली पदार्थांची तस्करी, घुसखोरी रोखण्यासाठी पोलिसांना काम करावे लागते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांच्या कामकाजात सुधारणा करण्यात आल्या आहेत. परंतु, अपुरे मनुष्यबळ, पोलिसांच्या घरांचा प्रश्न अजूनही कायम आहे.
पोलीस दलातील सुधारणा कागदावरच : जयंत उमराणीकर; फिरोदिया महाविद्यालयात परिसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 1:10 PM
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात ‘पब्लिक कन्सर्न फॉॅर गव्हर्नन्स ट्रस्ट’च्या सहकार्याने ‘बेटर पोलिसिंग’या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्देपोलीस दलात सुधारणा करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करणे गरजेचे : जयंत उमराणीकरअपुरे मनुष्यबळ, पोलिसांच्या घरांचा प्रश्न अजूनही कायम : प्रकाश सिंग