पुणे : खडकीरेल्वे स्टेशनवरुन लोकलने जात असताना घाईघाईत तेथील बाकड्यावर महिलेच्या हातून ९० हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग विसरली गेली़. पोलिसांच्या लक्षात ही बॅग आल्यानंतर त्यांनी ती संबंधित महिलेच्या भावाकडे सुपूर्त केली़. याबाबतची माहिती अशी, श्रीदेवी राजेंद्र सत्तरगी (रा़ खोपोली) या आपल्या दोन लहान मुले व भावासह खडकीला आल्या होत्या़. २२ सप्टेंबरला सकाळी १० वाजता त्या परत खोपोलीला जात होत्या़. लोकलची वाट पाहत असताना त्यांनी तेथील बाकड्यावर बॅग ठेवली़. लोकल आल्यानंतर दोन लहान मुलांना घेऊन घाईघाईने जाताना त्यांच्या हातून बाकड्यावर बॅग तशीच राहिली़. लोकल गेल्यावर पुढची लोकल दीड तासाने असल्याने स्टेशनवर कोणीही नव्हते़. सहायक फौजदार आऱ एऩ जोशी आणि पोलीस शिपाई एम़ बी़ भोई हे प्लॅटफॉर्मवर गस्त घालत असताना त्यांच्या नजरेला ही बॅग आली़. त्यांनी ती घेऊन पोलीस चौकीत आले़ तितक्यात बॅगेतील मोबाईल वाजू लागला़. तेव्हा त्यांनी ती बॅग उघडली़. भीमाशंकर लांबजरे यांनी ही बॅग आपल्या बहिणीची असून आपण कासारवाडी स्टेशनला उतरुन पुन्हा माघारी येत असल्याचे सांगितले़. बॅगेत ५४ हजार ९४० रुपये, सोनसाखळी व मोबाईल असा ९० हजार रुपयांचा ऐवज होता़. पोलिसांनी खात्री करुन ही बॅग त्यांना परत केली़. लोकल गेल्यावर खडकी रेल्वे स्टेशन निमनुष्य होते़. पोलिसांच्या नजरेला ही बॅग पडली नसती तर ती संबंधितांपर्यंत पोहचणे मुश्किल झाले असते़.
खडकी रेल्वे स्टेशनवर विसरलेली बॅग पोलिसांनी केली परत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 2:45 PM
लोकल आल्यानंतर दोन लहान मुलांना घेऊन घाईघाईने जाताना त्यांच्या हातून बॅग बाकड्यावर तशीच राहिली़. लोकल गेल्यावर पुढची लोकल दीड तासाने असल्याने स्टेशनवर कोणीही नव्हते़.
ठळक मुद्देबॅगेत ५४ हजार ९४० रुपये, सोनसाखळी व मोबाईल असा ९० हजार रुपयांचा ऐवज