शर्यती सुरू होण्याच्या अगोदर पोलीस दाखल झाल्याने येथील उपस्थितांची मोठी तारांबळ उडत पळापळ झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील
ताब्यात घेतलेल्यांकडून दंडाच्या पावत्या करत बारा हजार रुपयांचा दंड वसूल करत आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.
वेल्हे तालुक्यातून भोर तालुक्याच्या हद्दीत जाणाऱ्या कोदवडी व करंदी ग्रामपंचायतीच्या हद्दीत जांबळमाळावर बैलगाडा शर्यतींचे
आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खबऱ्यामार्फत वेल्हे पोलिसांना माहिती मिळताच आज (ता. ५) रोजी सकाळी सहा ते साडेसहाच्या
सुमारास घटनास्थळी वेल्हे पोलीस दाखल झाल्याने येथील उपस्थितांची मोठी तारांबळ उडत पळापळ झाली. बैलगाडा मालकांनी
व आयोजकांनी येथून पळ काढला, परंतु येथे गर्दी केल्याप्रकरणी आयोजकांना ताब्यात घेऊन बारा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
दरम्यान, याठिकाणी बैलगाड्यांच्या दोन फेऱ्या झाल्या असल्याची चर्चा असून याबाबत वेल्हे पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.