शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

पिंपरीत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक; चरस, गांजा असा तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 5:04 PM

पोलिसांकडून जोरदार कारवाईला सुरुवात

ठळक मुद्देदुचाकीमध्ये लपून ठेवले होते अमली पदार्थ

पिंपरी: पिंपरीत अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ झाल्याने पोलिसांकडून जोरदार कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये चरससह गांजासहित एकूण ४ लाख २९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी बावधन येथे ही कारवाई केली असून याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

प्रशांत अनिल माळी (वय ३०), तेजस पुनमचंद डांगी (वय २६), सुजित गोरख दगडे (वय २३), राहूल कवडे, समीर शेख (सर्व रा. मुळशी), ओमकार राजेंद्र नगरकर (वय २२, रा. पुणे),  अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकातील उपनिरीक्षक राजेंद्र गोविंद महाडिक (वय ५४) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  माळी आणि नगरकर यांच्या ताब्यातील दुचाकीमधून २९८ ग्रॅम गांजा आणि नऊ ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आले. डांगी आणि दगडे यांच्या ताब्यातून १२ किलो ४३४ ग्रॅम गांजा इलेक्ट्रॉनिक छोटा वजनकाटा, गांजा पॅकिंग मशिन आणि रोख रक्कगम हस्तगत केली. समीर शेख आणि कवडे यांच्या खोलीतून एक किलो ४२८ ग्रॅम गांजा आणि नऊ ग्रॅम चरस असा एकूण चार लाख २९ हजार ७५० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस