महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाच्या शिष्टमंडळाने मागण्यांसंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी कोरोनाकाळात गावपातळीवर काम करताना राज्यातील २० पोलीस पाटलांचा मृत्यू झाला असून त्यांचा योग्य सन्मान राखून त्यांना प्रत्येकी रुपये ५० लाखांचा विमाकवच मंजूर करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याचबरोबर ग्रामपंचायत कार्यालयात अथवा इमारतीमध्ये पोलीस पाटलांसाठी स्वतंत्र कार्यालय याशिवाय पोलीस पाटलांवर हल्ला वा अन्याय करणाऱ्या व्यक्तींवर ३५३ सारखे कलम लावण्यात येऊन अदखलपात्र गुन्हे दाखल करण्याचा निर्णय झाला. उर्वरित पोलीस पाटलांचे ६५ वयाबाबत व मानधन वाढीबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेऊ. असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस पाटलांना आश्वासन दिले. दम्यान, गृह राज्यमंत्री सतेज बंटी पाटील यांनी पोलीस पाटलांच्या मागण्यांबाबत योग्य निर्णय घेतला जाईल असे सांगतानाच गृह विभागाला मान्य करण्यात आलेल्या मागण्यांसदर्भात जी आर काढण्याचे आदेश दिले.
यावेळी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, दादा पाटील काळभोर (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ), चिंतामण पाटील , विजय कुंजीर, अशोक सांगळे, सोमनाथ मुलाणे, तृप्ती मांडेकर, रोहिणी हांडे, हर्षदा संकपाळ, मोनिका कचरे आदी उपस्थित होते.
२१ राजगुरुनगर पोलीस पाटील
गृह राज्यमंत्री अनिल देशमुख, सतेज पाटील यांच्याशी चर्चा करताना पोलीस पाटलांचे शिष्टमंडळ.