तुकाई दर्शन येथील चौरंग टेरेस येथे राहणारे तानाजी देशमुख यांचे कुटुंब. सध्या ते मुंढवा पोलीस चौकीत कार्यरत आहेत. त्यांचे एकूण १२ जणांचे एकत्र कुटुंब आहेत. गेल्या दीड वर्षांपासून न थांबता जनतेत जाऊन काम करत आहेत. जनतेशी निगडित काम असल्यामुळे ते कोविड पॉझिटिव्ह झाले. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील त्याचे आई, वडील व भाऊ, वहिनी ह्यादेखील पॉझिटिव्ह आल्या. पण त्यांनी ह्या परिस्थितीमध्ये देखील पुणे मनपाच्या दवाखान्यातील औषध उपचार घेऊन घरीच सोसायटीतील वेगळा फ्लॅट घेऊन विलगीकरणात राहून कोरोनावर मात केली.
विशेष म्हणजे त्यांनी त्यांचे आई वडील सत्तरीमध्ये असताना त्यांना मोठा आधार दिला. चौरंग सोसायटीत राहणाऱ्या कुटुंबाला सोसायटीतील काही पदाधिकाऱ्यांनी मोलाची साथ दिली. त्यांच्या पुतणीने देखील या परिस्थितीत न घाबरता त्याचा मोठ्या धीराने कोरोनाचा सामना केला. त्यांचे आई-वडिलांनी काही दिवसांपूर्वीच लस घेतली असल्यामुळे त्यांना होणारा त्रास हा जास्त नव्हता. त्यामुळे त्यांनी सहजतेने कोरोनावर मात केली. या उदाहरणावरून लोकांनी एक गोष्ट शिकली पाहिजे की न घाबरता तुम्ही कोरोना आजारातून बरे होण्यासाठी भीती आपल्यातून बाहेर काढणे गरजेचे आहे.