पुणे : शहरातील नागरिकांसह महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये पोलीस काका, बडी कॉप आणि सिटीसेफ अॅपचा समावेश आहे. या उपक्रमांबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने एक अभिनव पाऊल उचलण्यात आले असून, ‘वुई मेक पुणे सिटी सेफ’ या अभियनांतर्गत पुणे पोलिसांच्या वतीने सोमवारी(दि. २५ सप्टेंबर) रॅली काढण्यात येणार आहे. ‘लोकमत’ या उपक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे.पोलीस मुख्यालय गेटच्या डावीकडे वळून वीर चाफेकर चौक, यूटर्न घेऊन सिमला आॅफिस चौक, संचेती चौक, उजवीकडे वळून स. गो. बर्वे चौक, सरळ जे. एम. रस्त्याने मॉडर्न कॉलेज चौक, झाशीची राणी चौक, नटराज चौक, गरवारे पुलावरून गुडलक चौक, एफ.सी. रोडने फर्ग्युसन कॉलेज गेट, तुकाराम पादुका चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, ललित महल चौक, वीर चापेकर चौक, उजवीकडे वळून सिमला आॅफिस चौक, संचेती चौक, डावीकडे वळून इंजिनीअर कॉलेज चौक, सरळ संगम पुलावरून आरटीओ चौक, जहांगीर हॉस्पिटल चौक, मंगलदास चौकी चौक, उजवीकडे वळून वाडिया कॉलेज पूलावरून आय. बी. चौक, रेसिडन्सी क्लब, कौन्सिल हॉल चौक, पूना क्लब, ब्लू नाईल चौक, डावीकडे वळून इस्कॉन मंदिर, उजवीकडे वळून डॉ. आंबेडकर पुतळा, डावीकडे मग उजवीकडे वळून सरळ बॉम्बे गॅरेज चौक, उजवीकडे वळून महावीर चौक, पु. ना. गाडगीळ, उजवीकडे वळून एम. जी. रस्त्याने अरोरा टॉवर चौक, दौराबजी चौक, नेहरू मेमोरिअल हॉल चौक या मार्गाने बी. जे. मेडिकल मैदानावर रॅलीची समाप्ती होणार आहे.विद्यार्थीही होणार सहभागीशिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयावरून दुपारी ४ वाजता या रॅलीला पोलीस आयुक्तरश्मी शुक्ला यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ होणार आहे.या रॅलीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, सर्व पोलीस कर्मचारी, विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
सुरक्षित शहरासाठी पोलिसांची उद्या रॅली, ‘वुई मेक पुणे सिटी सेफ’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 4:46 AM