शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणाऱ्या स्वाभिमनी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पाेलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 12:25 PM

मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाेलिसांनी घेतले ताब्यात

पुणे : पुण्यातील बालेवाडी येथील क्रिडा संकुलात खेलाे इंडिया युथ गेम्सच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आले असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन चार तासांनी साेडून दिले. 

दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात यावी, एक रकमी एफ आरपी देण्यात यावी, महापाेर्टलद्वारे भरती न करता एम पी एस सी द्वारे भरती करावी तसेत शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी फी परवडत नसेल तर शिक्षण साेडून दे या केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच जाेरदार घाेषणाबाजी केली. पाेलिसांनी तात्काळ परिषदेचे कार्यकर्ते अमाेल हिप्परगे, प्रवीण भाेसले, शर्मिला येवले, साैरभ वळवडे यांना ताब्यात घेतले. त्यांना हिंजवडी पाेलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना समज देऊन साेडून देण्यात आले. 

हिप्परगे म्हणाले, आमच्या विविध मागण्यांसाठी आम्ही मुख्यमंत्र्याचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच विनाेद तावडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी आमची मागणी आहे. यावेळी पाेलिसांनी आम्हाला काहीवळे ताब्यात घेऊन साेडून दिले. 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाStudentविद्यार्थीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस