लोणावळा - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात असताना या ताफ्यातील पोलीस पायलेटिंग मोटार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाच्या खाली आज सकाळी उलटली. यामध्ये एकाला किरकोळ मार लागल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आजचा दिवस हा अपघाती दिवस बनला आहे. सकाळी खोपोली शहरच्या हद्दीत ढेकू गावाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात झाला होता. या अपघातात दोन जण ठार तर चार जण जखमी झाले होते. याठिकाणी झालेली अपघातांची कोंडी कमी होते न होते तोच खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमृतांजन पुलाच्या खाली पोलीस व्हॅन पलटी झाली.
शरद पवार यांचा ताफा आज सकाळी मुंबईच्या दिशेने जात असताना ताफ्यात मागे असलेली पोलीस व्हॅन क्र. (एमएच 12 एनयु 5881) च्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यात पलटी झाली. महामार्गावरील देवदूत पथक व खंडाळा महामार्ग पोलिसांनी तात्काळ गाडीमधील चालक व किरकोळ मार लागलेल्या पोलीस कर्मचार्यावर प्राथमिक उपचार करत अपघातग्रस्त वाहन बाजूला केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : लढ्याला यश! शरीरात कोरोनाचा 'मित्र' आणि 'शत्रू' कोण?; संशोधनातून नवा खुलासा
"विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाहीत"
CoronaVirus News : पर्यटकांना 'या' देशाने दिली स्पेशल ऑफर, कोरोना झाला तर देणार तब्बल 2 लाख
TikTok वापर करताय?, लाखो युजर्सचा डेटा धोक्यात; 'हा' Video नक्की पाहा
Video - ...म्हणून Zomato च्या कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा, जाळले कंपनीचे टी-शर्ट
CoronaVirus News : जगातलं सगळ्यात मोठं कोविड केअर सेंटर पाहिलंत का?... आपल्याच राजधानीत आहे!