पिंपरी : गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाव भोसरी येथील जत्रा मैदान येथे रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला.
शहानवाज नजीर बेग (वय ४१), शौकत नजीर बेग (वय ४२, दोन्ही रा. थेरगाव), अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांनी याप्रकरणी रविवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्याच्या प्रकरणात गणेश सावंत आणि पोलीस कर्मचारी सुमित देवकर हे दोघे तपासकामी गेले असता आरोपीने संगनमत करून त्यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. पोलीस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.