ही संकल्पना महामार्ग पोलीस पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संजय जाधव व पोलीस उपाध्यक्ष प्रीतम यावलकर, पोलीस निरीक्षक राजा सस्ते यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग पोलीस केंद्र बारामती फाटा राबवत आहे. हद्दीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गावर जागोजागी हे दूत ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. अपघातातील जखमी व्यक्तींना सेवा कशी द्यावी याबाबत त्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
यात महामार्गावरील गॅरेज, लोकल धाबा, हॉटेल, पेट्रोल पंपावर काम करणारी व्यक्ती यांचा समावेश राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय काही खाजगी हॉस्पिटल तसेच सरकारी हॉस्पिटल डॉक्टर यांचा यात समावेश असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. हा संकल्प अपघातग्रस्तांना जीवनदायी ठरणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस केंद्र बारामती फाटाचे प्रभारी अधिकारी मेघनाद नवले यांनी दिली आहे. बारामती फाटा येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी पोलीस केंद्र बारामती फाटाचे प्रभारी अधिकारी मेघनाद नवले, पोलीस उपनिरीक्षक महेश कोंडूभैरी व सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांना व पोलीस कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना पोलीस अधिकारी.