पुणे : पुणेकरांनी वाहतूक नियमाबाबत अधिक सजग आणि जागरुक होत नियमांचे पालन करावे या हेतुने पुणे वाहतूक पोलिस व बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्सच्यावतीने अभिनव उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. यात वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या पुणेकरांना मोटार विमा खास सवलतीत मिळणार आहे. नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबद्द्लची जागरुकता वाढीस लागावी या उद्देशातून याप्रकारच्या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. गुरुवारी पुणे पोलीस आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ.संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, बजाज अलियांंझ जनरल इन्शुरन्सचे सीईओ तपन सिंघेल आणि ससिकुमार अदिमामु उपस्थित होते. डॉ.व्यंकटेशम म्हणाले, 2018 मध्ये 240 जणांना जीवघेण्या अपघाताला सामोरे जावे लागले. 2019 मध्ये ती संख्या 197 इतकी आहे. प्रशासनाने सातत्याने राबविलेल्या विविध वाहतूक नियमाच्या उपक्रमामुळे 43 जीवघेणे अपघात कमी करण्यास सुरु अपघातात जीव गमावावा लागला. यापुढील काळात वाहतूकीची शिस्त आणि नियम पाळणा-यांकरिता त्यांना मोटार विम्यात सवलत देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वर्षभरात ज्या वाहतूकदारांनी नियमांचे पालन केले आहे त्यांना यात सहभागी होणार आहे. पुण्यासारख्या शहरात याप्रकारच्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास इतर जिल्हयात देखील तो राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सिंघेल यांनी इन्शुरन्सविषयी माहिती दिली. ते म्हणाले, वाहतूक नियम पालनाला चालना मिळावी याकरिता मोटार वाहन इन्शुरन्स सवलतीत देण्याचा मानस आहे. या कामी पुणे वाहतूक पोलिसांचे सहकार्य मिळणे ही निश्चितच आनंदाची बाब आहे. विम्याचा लाभ घेण्याकरिता नागरिकांनी पुढाकार घ्यावा. असे आवाहन सिंघेल यांनी केले. विम्याकरिता वर्षभराचा कालावधी ठेवण्यात आला असून त्यात कुठल्याही प्रकारचा दंड न झालेल्या नागरिकांना सवलतीत विमा काढता येणार आहे.
वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांकरिता पोलिसांची ‘‘पॉलिसी’’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 4:26 PM
वाहतूकीचे नियमाचे पालन करणाऱ्यांना मिळणार लाभ....
ठळक मुद्देपुणे वाहतूक पोलिस आणि बजाज अलाएन्स इन्शुरन्स उपक्रम वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या पुणेकरांना मोटार विमा खास सवलतीत मिळणारनागरिकांमध्ये वाहतूक नियमांबद्द्लची जागरुकता वाढीस लागावी हा उद्देश