पुणे : मतदानासाठी आता केवळ चार दिवस उरल्याने राजकीय पक्षांकडून मतदारांना त्यांचे नाव, मतदान केंद्राचा उल्लेख असलेल्या स्लीप वाटण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामाध्यमातून प्रचाराची संधीही साधली जात आहे. त्यासाठी हजारो कार्यकर्त्यांना कामाला लावण्यात आले आहे.पुणे लोकसभा मतदारसंघात २० लाख ७४ हजार ८६१ मतदार आहेत. सर्वच मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांकडून विविध माध्यमातून प्रचार केला जात आहे. पदयात्रा, सभा, बैठका, मेळावे, गाठीभेटी घेतली जात असल्याने प्रचारात रंगत आली आहे. पण त्याचबरोबर आता मतदारांना त्यांचे मतदान केंद्राची माहिती पोहचविण्यासाठी राजकीय पक्षांकडून चढाओढ सुरू झाली आहे. मतदानाच्या स्लीपबरोबच उमेदवाराची जाहिरातही केली जात आहे. राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदाराची स्लीप तयार केली असून बुथ अध्यक्ष, पोलिंग एजंटकडे बुथनिहाय मतदारांची यादी सुपुर्द केली आहे. बुथ प्रमुख, पन्ना प्रमुख अशी यंत्रणा पक्षांनी उभारली आहे. प्रत्येक बुथनिहाय मतदारांना स्लीप वाटण्यासाठी उमेदवारांनी कार्यकर्त्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे. पुढच्या दोन-तीन दिवसात स्लीप वाटपाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सर्व बुथ प्रमुखांकडे एव्हाना मतदारांच्या याद्या व स्लीपा पोहचवण्याचे काम सुरु झाले आहे. काही प्रभागांमध्ये प्रत्यक्ष स्लीप वाटपाचे कामही सुरू करण्यात आले आहे. मतदाराचे नाव, पत्ता, मतदान केंद्र अशी माहिती या स्लीपवर आहे. तर वरील बाजूला उमेदवाराचे छायाचित्र, चिन्ह व त्यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतदारानाच्या एक-दोन दिवस आधी याचे वाटप पुर्ण केले जाईल. काहींनी व्हॉट्स अँपवरुनही स्लीपा पाठवण्याचा आधुनिक मार्ग स्विकारला आहे. -------------
राजकीय पक्षांची आता मतदारांना स्लीप वाटपासाठी लगबग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 1:24 PM
आता मतदारांना त्यांचे मतदान केंद्राची माहिती पोहचविण्यासाठी राजकीय पक्षांकडून चढाओढ सुरू झाली आहे..
ठळक मुद्देपुणे लोकसभा मतदारसंघात २० लाख ७४ हजार ८६१ मतदार सर्वच मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांकडून विविध माध्यमातून प्रचारपदयात्रा, सभा, बैठका, मेळावे, गाठीभेटी घेतली जात असल्याने प्रचारात रंगत