शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

राजकारणी तिरस्काराचे धनी

By admin | Published: May 29, 2015 1:00 AM

पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणे इतकेच त्यांचे कार्य असते, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.

पुणे : राजकारणी लोक तिरस्काराचे धनी असतात, त्यांना पुरस्कार कधीच मिळत नाहीत, पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणे इतकेच त्यांचे कार्य असते, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.श्रींची इच्छा या नाट्य संस्थेतर्फे देण्यात येणारा मोहन वाघ स्मृती पुरस्कार प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांना ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते देण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे, यांच्यासह रंगकर्मी बाबा पार्सेकर, गायक त्यागराज खाडीलकर, उल्का चौधरी, मोहन कुलकर्णी, श्रींची इच्छाचे विश्वस्त अविनाश खर्शीकर, अध्यक्ष विजय जोशी तसेच भाऊसाहेब भोईर, भैरवनाथ शेरखाने आदी व्यासपीठावर होते. ठाकरे यांनी मोहन वाघ यांच्या शिस्तबद्ध स्वभावाची आठवण सांंगितली. ते म्हणाले नाट्यवेड्या महाराष्ट्राला त्यांच्याविषयी वेगळे सांगण्याची गरज नाही. ते उत्तम फोटोग्राफर म्हणूनही प्रसिद्ध होते. रंगांची त्यांना चांंगली जाण होती.’’तीच खरी अभिजात कलाआपणास मिळालेला पुरस्कार वयैक्तिक नसून चित्रकलेतील व्यापक दृष्टीला आहे, तीच व्यापक दृष्टी सध्या कमी झाली आहे, असे नमूद करुन परांजपे सत्काराला उत्तर देताना म्हणाले ज्या कलेत बुद्धी आणि भावनांना आव्हान देण्याची ताकद असते, ती खरी अभिजात कला. प्रत्येक कलाकाराची कला अभिजातच असली पाहिजे. दृष्य कला सर्वांना जोडणारी आहे. चित्र हा कलेचा समान धागा आहे. चित्रकाराला खडतर स्थितीतून प्रवास करावा लागतो असे फडणीस यांनी सांगितले. जोशी यांनी प्रास्तविक केले. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश खर्शीकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)