शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

भाजपकडून दहशतीचे, आमिषाचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 11:38 PM

पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप : आश्वासनांचा हिशेब जनता विचारेल

पुणे : भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत दहशतीचे आणि आमिषाचे राजकारण केले जात आहे. साम, दाम, दंड, भेद यावर भाजपचे सुरू असलेले राजकारण दुर्दैवी आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच ज्यांनी प्रसंगी तुरूंगवास सोसून भाजप पक्षाला सत्ता मिळवून दिली, त्यापैकी भाजपचा एकाही कार्यकर्ता किंवा संघाची विचारधारा असणाऱ्या व्यक्तीला भाजपने निवडणुकीसाठी उमेदवारी दिली नाही. अनेक उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांतून आयात केले आहेत. भाजपला याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहत आहेत, असेही चव्हाण यांनी नमूद केले.

कॉँग्रेस पक्षाचे पुण्याचे लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण, आमदार विश्वजित कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रवीण गायकवाड, संगीता तिवारी आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, भाजपकडून व्यक्तिकेंद्रीत राजकारण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्याच प्रचारसभेत मिळालेला प्रतिसाद पाहता मोदी लाट पूर्णपणे ओसरली आहे. मागील निवडणुकीत मोदींनी दिलेली आश्वासने किती पूर्ण झाली, त्याचे आकलन लोकांनी केलेले आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, असे लोक भाजपला विचारत आहेत.काँग्रेसने प्रकाशित केलेला जाहीरनामा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे. या जाहीरनाम्यातील मुद्यांसह शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच राफेलमधील घोटाळा या मुद्द्यांवर काँग्रेसतर्फे प्रचार केलाजाणार आहे.गोळीबाराचा मुद्दा केवळ आरोपापुरताचच्मावळ येथील शेतकरी गोळीबाराषियी ते म्हणाले, या प्रकारच्या घटनांबाबतचे आदेश कधीही राजकीय स्तरावर दिले जात नाहीत. स्थानिक परिस्थिती पाहून तेथील प्रमुख पोलीस अधिकारी यावर निर्णय घेत असतात. परंतु, या घटनेची सर्व चौकशी व इतर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.त्यामुळे हा मुद्दा राजकीय आरोप करण्यापुरता उरला आहे.

 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपा