मतांवर डोळा ठेवून युद्धाचे राजकारण- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 01:15 AM2019-03-04T01:15:34+5:302019-03-04T01:16:34+5:30

निवडणुकीच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली जात आहे, सगळ्यात जास्त जवान मोदी सरकारच्या काळात शहीद झाले

Politics of war by keeping eye on votes - Ajit Pawar | मतांवर डोळा ठेवून युद्धाचे राजकारण- अजित पवार

मतांवर डोळा ठेवून युद्धाचे राजकारण- अजित पवार

Next

कळस : निवडणुकीच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली जात आहे, सगळ्यात जास्त जवान मोदी सरकारच्या काळात शहीद झाले, मात्र किती दहशतवादी मारले याचा आकडा सांगितला जात नाही, युध्दाबाबत ठोस धोरण घेतले जात नाही, युद्धाचे परिणाम चांगले नसतात, तरी मतांवर डोळा ठेवून राजकारण केले जात आहे, असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
शेळगाव (ता. इंदापुर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाची जाहिर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, बाजारसमितिचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, माजी अध्यक्ष बाळासाहेब घोलप, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, अमोल भिसे, सरपंच रामदास शिंगाडे,उपसरपंच तानाजी ननवरे,युवकाचे जिल्हा उपाध्यक्ष शुभम शिंगाडे, अ‍ॅड अशोक शिंगाडे उपस्थित होते.
पवार म्हणाले की, राज्यात दुष्काळी सावट आहे. उजनीचा वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही, भाजप शासनाकडून बाजार समिती, साखर कारखान्यात राजकारण केले जात. आहे युद्धजन्य परिस्थितीमुळे अधिवेशन संपवावे लागले अशी परिस्थिती असतानाही भाजपकडून यामध्ये राजकारण केले जात आहे. कर्जमाफी केली नाही, शेतीमालाला भाव नाही, शेतकरी सन्मान योजना फसवी असून यांच्या काळात डान्सबार पुन्हा चालु केले गेले. यामुळे तरुण पिढी उध्वस्त होत आहे नोकरभरती फसवी आहे उद्योग पतींना सवलत दिली जात आहे. मात्र शेतकऱ्यांना झुलवत ठेवले जात आहे. राज्यावर कजार्चा बोजा आहे. तालुक्यातील गटबाजी चालणार नाही इंदापूरने मला खासदार म्हणून मताधिक्य दिले. त्यामुळे इंदापूरला तालुक्याला विकासासाठी नेहमीच झुकते माप दिले. रस्ते नेहमीच महत्वाचे आहेत माझ्या पेक्षाही जास्त निधी इंदापुरला भरणे यांनी दिला. प्रास्ताविक अ‍ॅड लक्ष्मणराव शिंगाडे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन देवडे यांनी केले
>धनगर समाज आंदोलनाला भाजपाने रसद पुरवली
धनगर समाजाला आंदोलन करण्यासाठी भाजपने रसद पुरविली आंदोलन करत असताना आंदोलक हेलिकॉप्टर मधुन फिरत होते. आरक्षणावरुन दिशाभूल केली जात आहे. धनगर आरक्षणाबाबत टीस अहवाल धूळखात पडला आहे. धनगर समाजाला फसिवले जात आहे.मात्र अदिवासीच्या शैक्षणिक सवलती देणार असल्याचे जाहीर केले. मात्र अर्थसंकल्पात तरतूद केली त्यामुळे भाजपाने केवळ फसविण्याचे काम केले आहे.

Web Title: Politics of war by keeping eye on votes - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.