लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जिल्ह्यातील बारा तालुक्यांतील निवडणुक लागलेल्या २२२ ग्रामपंचायतींपैकी ४९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित १७३ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रकिया पार पडत आहे. पुरंदर तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही. जिल्ह्यात जनतेतून प्रथमच थेट सरपंचांची निवडणूक होणार असल्याने नागरिकांमध्ये यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. सकाळी ७-३० ते सायंकाळी ५-३० या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर बारा तालुक्यांतील या गावांमध्ये जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे तयारी पूर्ण झाली असून, चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.वेल्हे तालुक्यातील १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, १८ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी ५१ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. यासाठी एकूण ३०६ कर्मचारी तैनात केले आहेत. अतिदुर्गम असणाºया आणि संपर्कासाठी अवघड असणºया डोंगरदºयांमधील गावांमधे मतदान होणार आहे. महसूल विभाग सर्व निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सज्ज असल्याची माहिती वेल्हे तालुका न्यायदंडाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रदिप उबाळे यांनी दिली. वेल्हे तालुक्यातील शिरकोली, हारपूड, बालवड, शेनवड, टेकपोळे, गिवशी, कोशिमघर, कोंडगाव, गोंडेखल, वडघर, गुंजवणे, सोंडे हिरोजी, सोंडे सरपाले, सोंडे माथना, जाधववाडी, धानेप, पाल बुद्रुक व केळद या १८ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होणार आहे. यामधील बहुतांश गावे दुर्गम ठिकाणी आहेत. यामुळे खबरदारीकरिता स्वतंत्र कंट्रोल व बँलट युनिट अशी मतदान यंत्रे चालू स्थितीत असल्याची खात्री करूनच निवडणूक विभागाच्या मुख्य ठाण्यातून मतदान यंत्रणेला हलविण्यात आली आहेत.मुळशी तालुक्यातील ११ पैकी ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता ४ ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. तर ११ गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत एकूण ७ सरपंच बिनविरोध निवडून आलेले आहेत. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे : पाथरशेत, तव, कोंढूर, लवार्डे, मोसे खुद, वांजळे व दासवे या ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात स्थानिक ग्रामस्थ व नेते मंडळीना यश आले. अन्य आसदे, आडमाळ, भोडे व माळेगाव चार ग्रामपंचायतीच्त मतदान होणार आहे. भोंडे ग्रामपंचायतीत एकही सदस्य बिनविरोध झाला नाही या ठिकाणी सर्व जागांसाठी निवडणूक होईल. आसदे व भोडे या ठिकाणी सरपंच पदासाठी प्रत्येकी ५ उमेदवार रिंगणात असतील माळेगाव येथे सरपंच पदासाठी ४ उमेदवार आडमाळ येथे एका वार्डातील एका सदस्य पदासाठी २ उमेदवार तर सरपंच पदासाठी २ उमेदवार रिंगणात असतील.आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींपैकी एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही. त्यामुळे २२ ग्रामपंचायतींमध्ये मतदार होणार आहे.जुन्नर तालुक्यातील १५ पैकी ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. एका ग्रामपंचायत रिक्त राहणार असून, उर्वरित ९ ग्रामपंचायतींत निवडणूक होणार आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यात एकूण ३३ मतदानकेंद्र असून जवळपास २०० कर्मचारी मतदानासाठी तैनात केले आहेत. बंदोबस्तासाठी ४० पोलीस कर्मचारी कार्यरत असणार आहेत. काले, भिवाडे खु, पारगाव तर्फे आळे, सावरगाव या चार ग्रामपंचायतीची सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर वानेवाडी व सुलतानपुर या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी एकही अर्ज न आल्याने सरपंच पद रिक्त राहणार आहे. तसेच आदिवासी भागातील आंबे व हातविझ या गावांमध्ये केवळ सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे. सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात राहिलेल्या उमेदवारांची संख्या- सोमतवाडी ३, काळवाडी २ , साकोरी २, आणे- ४, बोतार्डे २, शिंदे २, हिवरे तर्फे मिन्हेर २, आंबे ४ आणि हातविझ ४.बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. सरपंच पदाच्या ३८, तर सदस्यपदाच्या २६३ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. त्यासाठी ३५ हजार ३८५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ५१ मतदान कें द्रांवर हे मतदान होणार आहे. सरपंच पदासाठी ३८, तर सदस्यपदासाठी २६३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदार ठरविणार आहेत. लोणी भापकर, काºहाटी, सोनकसवाडी, वाणेवाडी, कुरणेवाडी, मासाळवाडी, मुरुम, मोरगाव, पळशी, गडदरवाडी, पणदरे, सोरटेवाडी, वाघळवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. सरपंचपदासाठी एकही उमेदवार बिनविरोध निवडून आलेला नाही. सरपंच पदासाठी ३८, तर सदस्य पदासाठी २६३ उमेदवार निवडणुकीच्या रींगणात आहेत. तर ४ ग्रामपंचायतींचे सदस्यपदाचे २५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये काºहाटी २, सोनकसवाडी ६, वाणेवाडी ७, मुरुम १० अशी एकूण २५ उमेदवारांचा समावेश आहे.इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीपैकी ४ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या असून, उर्वरित २२ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. त्यानंतर आंबेगाव तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीसाठी लढत होत आहे.हवेली तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक संपन्न होत आहे. यासाठी शासकीय यंत्रना सज्ज झाली असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांनी दिली. कदमवाकवस्ती, आव्हाळवाडी, पेरणे, बुर्केगाव, अहिरे, नांदोशी, पिंपरी-सांडस व गोगलवाडी या आठ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. आठ ग्रामपंचायतीच्या ३९ मतदान केंद्रे व १० राखीव केंद्रासाठी ४९ मतदान केंद्राध्यक्ष, १५० मतदान अधिकारी व ५० शिपाई अश्या एकून २५० अधिकारी व कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे.भोर तालुक्यातील २० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून ३४ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. त्यासाठी सुमारे ५९४ कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. तर ६० कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ग्रापंचायतीच्या ९९ केंद्रासाठी ९९ केंद्र प्रमुख, ९९ मतदान केंद्राध्यक्ष, ९९ शिपाई, ९९ पोलीस कर्मचारी यात ६ अधिकारी ६० पोलीस व ४८ होगाडइचा समावेश असून एकूण ५९४ कर्मचारी नेमले असुन ६० कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.दौंड तालुक्यात आठ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार राजकुमार वाघमारे यांनी दिली. याकामी २७ बुथ उभारण्यात आले आहे. तर १३५ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. नांदूर, लोणारवाडी, डाळींब, बोरीभडक, दापोडी, पाठेठाण, देवकरवाडी, दहिटणे या आठ ग्रामपंचायतीच्या ७४ जागांसाठी १४८ ऊमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तर थेट सरपंचाच्या ८ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात आहे.खेड तालुक्यातील २३ पैकी ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित १९ गावांची निवडणूक होणार आहे. सकाळपासुनच अधिकारी, कर्मचाºयांची मतदान पेट्या घेऊन गावात मुक्कामी जाण्यासाठी लगीनघाई दिसून आली. पोलिसांचा मोठा फौजफाटा कर्मचाºयांसोबत बंदोबस्तासाठी रवाना झाला. येलवाडी, साकुर्डी, शिरोली, वाडा, देवोशी, कोरेगाव खुर्द, पापळवाडी, गारगोटवाडी, चास, सिद्धेगव्हाण, येणिये खुर्द, सुरकुंडी, बहिरवाडी, शेलगाव, आंभू, दौंडकरवाडी, आव्हाट, मांजरेवाडी, बहूळ या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. सरपंच पदासाठी ६१, तर सदस्य पदासाठी २११ जण रिंगणात आहे. सदस्य पदाचे ९५ उमेदवार बिनविरोध झाले आहे. भांबोली, अनावळे, मिरजेवाडी, साबळेवाडी या चार गावांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ग्रामपंचायतीसाठी ६३ मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. या केंद्रावर ३५० अधिकारी व कर्मचारी नेमणूक करण्यात आली आहे. तसेच ४ पोलीस निरिक्षक, ५४ पोलीस, ४० होमगार्ड व राज्य राखीव दलाची एक तुकडी निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात केला आहे.
गावकारभा-यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद, जिल्ह्यात १७३ ग्रामपंचायतीत आज मतदान, उद्या होणार मतमोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 2:50 AM