राज्याच्या तंत्र शिक्षण विभागातर्फे ३० जून पासूनच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी ही प्रक्रिया सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे फायदे माहित झाले. त्यामुळे आत्तापर्यंत पुणे विभागातील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत.
--------------
पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू झाली.परिणामी या अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यास निर्माण होण्या-या रोजगाराची माहिती मिळाली. त्यामुळे मी ऑनलाईन अर्ज केला आहे. तसेच शुक्रवारी (दि.१६) दहावीचा निकाल प्रसिध्द होणार आहे. त्यामुळे प्रवेशा प्रक्रिया लवकर पूर्ण होईल.
- आरुष काटे, विद्यार्थी
----------
प्रवेश अर्ज भरण्यासाठी २३ जुलैपर्यंत मुदत दिली असली तरी तंत्र शिक्षण विभागाकडून मुदतवाढ दिली जाईल.त्यामुळे दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर सुध्दा अनेक विद्यार्थी पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अर्ज करतील.निकाल जाहीर होण्यापूर्वी सुध्दा अनेकांनी अर्ज केला आहे.
- आवेग काटे, विद्यार्थी
-------------------------------
दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याने शुक्रवारपासून पॉलिटेक्निक प्रवेशाची गती वाढेल.तसेच कोरोनाचे संकट अनिश्चित आहे.तिसरी लाट आली नाही;तर यंदा सुध्दा प्रवेशास विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल.
- राजेंद्र उत्तूरकर ,प्राचार्य, पॉलिटेक्निक कॉलेज
----------------
तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून पॉलिटेक्निक प्रवेशाबाबत अनेक विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. कमी कालावधीत अधिक मनुष्यबळ निर्माण होते. तसेच विद्यार्थ्यांना रोजगाराची लवकर संधी प्राप्त होते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून प्रवेशास चांगला प्रतिसाद मिळेल.
अरविंद कोंडेकर, प्राचार्य, पॉलिटेक्निक कॉलेज
---------------------
पुणे विभागातील पॉलिटेक्निक प्रवेशाची क्षमता : ३२,०००
आत्तापर्यंत प्राप्त झालेले ऑनलाईन अर्ज : ९,५४९
-----------------
प्रवेशासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता
विद्यार्थ्यांकडे दहावीचा बैठक क्रमांक नाही. तसेच प्रवेश अर्जासाठी २३ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेशास मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे मागिल वर्षी प्रवेशावर परिणाम झाला होता. परंतु, यंदा त्याचा फारसा परिणाम होणार नाही,असा विश्वास विद्यार्थ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
---------------------------