इंदापूर : अवकाळी पाऊस आणि ‘ऑफ सीझन’मुळे डाळिंब बाजारामध्ये डाळिंबाची आवक तीन हजार क्रेटने घटली आहे. व्यापारी थेट डाळिंब बागांमध्येच जाऊन चांगल्या प्रतीची फळे खरेदी करीत असल्याने कमी गुणवत्तेचा माल डाळिंब बाजारामध्ये येत असल्याचे चित्र सध्या इंदापूर येथील डाळिंब बाजारामध्ये दिसत आहे.
इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब बाजारामध्ये आठवडय़ातील मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी डाळिंबाचा बाजार भरतो. या तीन दिवशी बाजारात 14 ते 15 हजार क्रेटएवढी डाळिंबाची आवक होत असते.
माळशिरस, फोंडशिरस, नातेपुते, गिरवी, मांडवी, शेळगाव, निमगाव केतकी, वरकुटे खुर्द आदी भागांमधून डाळिंबाची आवक होत असते. मागील महिन्यात परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे बहर धरलेल्या बागांमधील फूलगळ झाली. काढणीला आलेल्या डाळिंबावर डाग पडले. आधीच ‘ऑफ सीझन’ त्यात अवकाळी पावसामुळे डाळिंबाची आवक घटली.
आता सध्या या डाळिंब बाजारामध्ये 1क् ते 12 हजार क्रे ट डाळिंब येत आहे. म्हणजेच 3 हजार क्रेटची घट झाली आहे.
डाळिंबाला प्रतिकिलो 25 ते 155 रुपये भाव मिळत आहे. व्यापारी थेट डाळिंब उत्पादकांच्या बागांमध्ये जाऊन डाळिंब आणत असल्यामुळे बाजारात डाळिंब येत नाही.
तसेच, व्यापारी निवडक डाळिंब फळांची खरेदी शेतावर जाऊनच करतात. त्यामुळेही चांगल्या प्रतीची फळे बाजारात येत नाहीत. असे येथील मुख्य अडतदार अप्पा कानकाटे यांनी सांगितले. (वार्ताहर)
4 डाळिंब बाजारात येणा:या निर्यातक्षम फळांची निर्यात करता यावी, यासाठी निर्यातदार आणण्यात येणार आहेत. त्यासाठी बाजारात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निर्यातीचा दर आणि जागेवर खरेदी करण्याचा दर यामध्ये 1क् रुपयांचा फरक आहे. तो फरकही शेतक:यास देण्याचा निर्णय विचाराधीन आहे. तसेच, निवडक चांगल्या दर्जाची फळे बाजारात आणली, तर त्याचा फायदा शेतक:यालाच होणार आहे, असे मुख्य अडतदार अप्पा कानकाटे यांनी सांगितले.