देऊळगावगाडा, पडवी, माळवाडी परिसरामध्ये डाळिंबाच्या शेतीचे क्षेत्र हे जवळपास १०० हेक्टरीच्या पुढे आहे. मात्र तेल्यारोगाच्या प्रादुर्भावामुळे फळबागा डबघाईला आल्या असून आज जवळपास ७५ हेक्टर डाळिंबाच्या बागा शेतकऱ्यांनी काढून टाकल्या आहे. ऐन टंचाईच्या काळात टँकरने पाणी घालून झाडे जगवली होती. याच धर्तीवर भरघोस उत्पादनदेखील निघत होते. मात्र पडील दारातील बाजारभाव व फळबागावर सातत्याने होत असलेल्या तेल्या रोगाच्यामुळे उत्पादन क्षमतेत अलीकडच्या काळात कमालीची घट होत गेल्याने सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागाच काढून टाकण्याचा निर्णय घेतला असून तब्बल आतापर्यंत ७५ हेक्टर क्षेत्र ट्रॅक्टरच्या साह्याने काढून टाकण्यात आल्या आहेत.
पूर्वी एकरी १० टन एवढा माल निघत असताना गेली दोन वर्षांपासून एकरी १ ते २ टनदेखील एवढाच माल निघत आहे तसेच उत्पादन एकरी २० ते ३० हजार आणि छाटणी व औषध फवारणी यांचा एकरी खर्च दीड ते दोन लाख यामुळे शेतकरी डाळिंब बागाला अक्षरशः कंटाळला आणि पूर्ण बागच काढून टाकण्याचा निर्णय घेऊन आज ह्या फळबागा काढण्यात येत आहेत. रोगराईला शेतकरी वर्गाला सध्या सामोरे जाण्याची वेळ ही आली असून भविष्यात फळ बागा तरी कशा कराव्यात असाच प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांच्या पुढे उभा राहिला असल्याचे डाळिंब उत्पादक डी. डी. बारवकर यांनी सांगितले.
२२खोर
२२खोर१
तेल्यारोगाच्या प्रादुर्भावामुळे देऊळगावगाडा परिसरात शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने फळ बागा काढून टाकत आहे तर दुसऱ्या छायाचित्रात डाळींब बागाला तेल्यारोगाचा प्रादुर्भाव (छायाचित्र : रामदास डोंबे, खोर)