निमगाव केतकी : डाळींब विक्रीचे बाजारभाव वाढल्याने दलालांची डाळींब बागा विकत घेण्यासाठी झुंबड उडाली आहे. निमगाव परिसरातील बागा पाहायासाठी व डाळींब खरेदी करण्यासाठी दलाल रात्रंदिवस डाळींब उत्पादक शेतक:यांच्या संपर्कामध्ये असल्याचे चित्र आहे.
सद्य:स्थितीमध्ये डाळींब विक्रीचा बाजार प्रतिकिलोसाठी शंभर रुपयांच्या पुढे मिळत आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीची फळे असलेल्या बागांची विक्री करण्यासाठी शेतकरी प्रय} करत आहेत.
मात्र बाजार वाढला आहे हे ग्रामीण भागातील काही शेतक:यांना अद्याप माहीत झालेले नाही. त्यामुळे दलाल याचा फायदा उठवून कमीत कमी किमतीमध्ये बागा खरेदी करायच्या व त्यावरती जास्तीत जास्त नफा मिळवायचा, या उद्देशाने दलाल शेतक:यांशी संपर्क वाढवत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये जो डाळिंबाचा बाजार होता, त्या बाजारभावामध्ये डाळींब खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये काही शेतकरी फसत असून, कमी किमतीमध्ये शेतकरी आपल्या बागा दलालांच्या देत असल्याची चर्चा या परिसरामध्ये आहे.
सद्यस्थितीमध्ये असणा:या बागांमध्ये काही बागा या चांगल्या आहेत. यांना चांगला बाजारभाव सापडणो अपेक्षित आहेत. मात्र, शेतक:यांच्या चांगल्या मालालाही योग्य बाजार मिळत नसल्याचे चित्र आहे. याचे मुख्य कारण म्हणजे दलाल हे आहेत.
आता सध्या निमगाव परिसरामध्ये सरसकट 30 रुपयांपासून ते 50 रूपयांर्पयत प्रतिकिलो डाळींब
खरेदी दलाल करत आहेत.
यामुळे शेतक:यांचे नुकसान होत
आहे. तरी शेतक:यांनी बाजारभाव ठरवताना योग्य किमतीला ठरवण्याची काळजी घेणो आवश्यक
आहे. (वार्ताहर)
4मागील सहा महिन्यांमध्ये डाळींब पिकावर अनेक संकटे आली आहेत. डाळींब विक्रीसाठी समाधानकारक बाजारभाव, तर एकदाही शेतक:यांना मिळाला नाही. चांगल्या प्रतीच्या फळांनाही प्रतिकिलोस तीस ते चाळीस रुपयांपेक्षा जास्त बाजार कधीही मिळाला नाही. त्यामुळे शेतक:यांना फळे धरल्यापासून बागा जोपासण्यासाठी झालेला खर्चही निघाला नसल्याची अनेक उदाहरणो आहेत. याबरोबरच डाळींब बागा या गारपिटीमध्ये झोडपल्या गेल्या. याचाही मोठा फटका शेतक:यांना बसला आहे. अनेक बागा या गारपिटीने जमीनदोस्त झाल्या, तर काहींच्या साली गेल्याने निकामी झाल्या. या बागांना फळे येणोदेखील बंद झाले आहे. त्यामुळे डाळींब उत्पादनामध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. यामुळेच बाजारामध्ये वाढ होऊ लागली आहे.