निमगाव केतकी : निमगाव केतकी आणि परिसरातील गावे शेळगाव, सराफवाडी, पिटकेश्वर कौठली तसेच इंदापूर तालुक्यतील बहुतांश गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. परंतु, वातावरणातील बदलाचा फटका डाळिंब उत्पादकांना सहन करावा लागतो आहे. मादी कळीच्या तुलनेत नरकळीचे प्रमाण जास्त असल्याने हंगाम सुरू होण्यास उशीर होणार आहे. नरकळीमुळे डाळिंबबागा रिकाम्या झाल्या आहेत. १५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या काळात डाळिंबबागांच्या मशागती पूर्ण करून डाळिंबाचा बहार धरला जातो. या कालावधीत या बहराला हस्त बहार म्हटले जातो. हा बहार डाळिंब उत्पादनासाठी इतर बहारांच्या तुलनेत सुरक्षित समजला जातो. रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो; त्यामुळे औषधफवारणी कमी करावी लागते. परंतु, या वर्षी हस्ताच्या बहारामध्ये परिस्थिती उलटी झाली आहे.
नरकळीमुळे डाळिंबबागा रिकाम्या
By admin | Published: December 22, 2016 1:52 AM