शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण दारू पिऊन कठड्यावर बसली होती, सर्व बाजूंनी तपास सुरू; पोलीस अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 12:35 PM

Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या की घातपात की अपघात या सगळ्या दिशांनी तपास होत आहे..

पुणे : हडपसर परिसरात रविवारी (दि. ७) एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. महाराष्ट्रातील एका बड्या मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून या तरुणीने आत्महत्या केल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये सुरू आहे.  पूजा चव्हाण प्रकरणामध्ये आता वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत. पूजाने तिच्या मृत्युच्या पूर्वी मद्यपान केलेले होते. तसेच ती कठड्यावर बसलेली होती. त्यामुळे ती पडली का तिला पाडलं की तिने खरंच आत्महत्या केली आहे, याची चौकशी आता पोलिस करत आहेत. 

पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. विदर्भातील एका बड्या मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून या तरुणीने आत्महत्या केल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये सुरू आहे. या आत्महत्या प्रकरणावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारविरुद्ध टीकेची झोड उठवली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून या प्रकरणी कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात भाजप महिला आघाडीच्या वतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन देण्यात आले आहे. 

मात्र, या प्रकरणी आठवडा होत आला तरी पोलिसांकडुन अद्याप गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. यामध्ये तिच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मात्र ते सर्वजण बीड येथे आहेत. तसेच याप्रकरणात तक्रार देण्यात आलेली नाही. त्यामुळे अद्याप पोलिसांनी गुन्हा नोंद केला नसल्याचे पोलिसांकडुन सांगण्यात येत आहे. 

पुणे पोलिस दलातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “ पूजा पहिल्याच मजल्यावर होती. घटनेच्या वेळी ती दारु प्यायलेली होती. आणि कठड्यावर बसली होती. त्यानंतर ती तिथून पडली. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात की अपघात या सगळ्या दिशांनी तपास होत आहे” 

अर्थात या संपूर्ण प्रकरणात भाजप आक्रमक झाले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिप्स मध्ये ती ट्रिटमेंट झाल्यावर वारंवार आत्महत्या करण्याबाबत बोलत असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे आता केला जाणारा हा दावा हा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे हा असाही सवाल विचारला जातो आहे.

टॅग्स :PuneपुणेPooja Chavanपूजा चव्हाणDeathमृत्यूPoliceपोलिसministerमंत्रीState Governmentराज्य सरकारBJPभाजपा