शहरं
Join us  
Trending Stories
1
इक्बालसिंह चहल यांची पुन्हा बदली; आता देवेंद्र फडणवीसांच्या गृहखात्यात मोठी जबाबदारी
2
अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ! दररोज ९० घटना; ममता बॅनर्जींचे PM मोदींना खरमरीत पत्र
3
"महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा", महिला काँग्रेसची मागी   
4
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; विधानसभेपूर्वी राजकीय खलबतं?
5
आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा दिल्याचा दावा.. विरोधकांची टीका...आता CM शिंदेंनी कोर्टाचे पेपरच दाखवले
6
मुंबईचा जीडीपी ६ वर्षांत दुप्पट होणार; 'या' ७ गोष्टींवर देणार भर; निती आयोगाकडून CM शिंदेंना अहवाल!
7
पोस्टमार्टेम हाऊसमध्ये गर्लफ्रेंडसोबत चाळे करत होता सफाई कर्मचारी, व्हिडीओ व्हायरल
8
कोणत्या धर्माच्या लोकांनी केलं सर्वाधिक स्थलांतर? कितव्या क्रमांकावर आहेत हिंदू? जाणून घ्या
9
"तुझ्यासोबत हा शेवटचा सिनेमा", असं अक्षय कुमार करीना कपूरला का म्हणाला?
10
जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-NC एकत्रितपणे निवडणूक लढवणार, PDP चेही सोबत येण्याचे संकेत
11
नरेंद्र मोदींचा पहिला युक्रेन दौरा; युद्धक्षेत्रात कशी असेल पंतप्रधानांची सुरक्षा? जाणून घ्या...
12
"दिल्ली आणि गुजरात लॉबीसमोर झुकलेले, भाजपा सरकार उखडून फेका’’, नाना पटोले यांचं आवाहन  
13
मंदिरातील घंटा वाजवल्याने ध्वनिप्रदूषण! प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोसायटीला बजावली नोटिस
14
फक्त १ दिवस बाकी! क्रिकेटपटूंच्या महागड्या वस्तूंचा लिलाव; अनाथ मुलांसाठी मदतीचा हात
15
CM एकनाथ शिंदेंनी फाशीच्या शिक्षेचा उल्लेख केलेला 'तो' खटला शिवसेनेनं समोर आणला
16
लेहमध्ये भीषण अपघात, ६ जणांच्या मृत्यूची भीती, स्कूल बसमध्ये २८ प्रवासी प्रवास करत होते
17
किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा; उद्धव ठाकरे गटाची भूमिका
18
हॉटेलमध्ये करायची काम, २३ वेळा हिरोला किस केल्याने चर्चेत; आता आहे कोट्यवधींची मालकीण
19
'बिग बॉस मराठी' गाजवणाऱ्या सूरज चव्हाणची रुपेरी पडद्यावर 'झापुक झुपूक' एन्ट्री, झळकणार 'या' सिनेमात
20
खुशखबर! प्रधानमंत्री आवास योजना पाच वर्षांसाठी वाढवली; मोटारसायकल, फ्रीज असेल तरीही लाभ मिळणार

पूजा खेडकरने नाव बदलून दिली परीक्षा; ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ९ प्रयत्नांची असते मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 5:41 AM

पूजा खेडकर यांचे वडील आयएएस अधिकारी नव्हते, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विभागीय अधिकारी होते, ही बाब  पुढे आली आहे.

पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांचे यूपीएससीचे सर्व प्रयत्न संपल्यानंतर त्यांनी नाव बदलून परीक्षा दिली. तसेच, ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी ११ वेळा परीक्षा दिल्याची चर्चा  सर्वत्र रंगली आहे. मात्र, नियमानुसार या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना  जास्तीत जास्त ६ प्रयत्न असतात, तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही मर्यादा ९ आहे. मग, पूजा खेडकर या तब्बल ११ वेळा परीक्षा देऊ शकतात का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ११ प्रयत्न घेतल्याचे वृत्त व्हायरल होत असले, तरी त्याला दुजोरा मिळालेला नाही.

पूजा खेडकर यांचे वडील आयएएस अधिकारी नव्हते, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विभागीय अधिकारी होते, ही बाब  पुढे आली आहे. तसेच, पूजा यांनी ‘खेडकर पूजा दिलीपराव’ या नावाने २०२०-२१ पर्यंत परीक्षा दिली. त्यानंतर २०२१-२२ मध्ये त्यांनी ‘पूजा मनोरमा दिलीप खेडकर’, असे नाव बदलून प्रयत्न संपल्यानंतरही दोन वेळा परीक्षा दिली.

अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी पुण्यातही केले प्रयत्न

पूजा खेडकर यांनी नगरमध्ये सर्वप्रथम २०२१ ला दृष्टिदोष आणि मानसिक आजारी असल्याचे ५२ टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढले हाेते. परंतु, पुन्हा अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे २३ ऑगस्ट २०२२ रोजी लाेकाेमाेटाेर डिसॅबिलिटीचे (गुडघ्याची दुखापत) ७% चे प्रमाणपत्र मिळवले हाेते.

त्यानंतर त्यांनी औंध जिल्हा रुग्णालयात पुन्हा वेगळे प्रमाणपत्र काढण्याचा प्रयत्न केला हाेता. त्यांना आधीच अपंगत्व प्रमाणपत्र दिल्याची नाेंद सिस्टममध्ये  झाली होती. त्यामुळे अर्ज नामंजूर करण्यात आला, अशी माहिती औंध जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डाॅ. नागनाथ यमपल्ले यांनी दिली.

माझ्यावर लावलेल्या आराेपांबाबत केंद्रीय समितीसमाेर बाजू मांडणार आहे. प्रशिक्षणार्थी असल्यामुळे चाैकशीबाबत मी काेणतीही टिप्पणी करू शकत नाही. माझ्यासाेबत काय हाेत आहे, हे स्पष्ट दिसत आहे. जाेपर्यंत आराेप सिद्ध हाेत नाही, ताेपर्यंत काेणीही दाेषी ठरत नाही. मीडिया ट्रायलद्वारे मला दाेषी ठरविणे चूकीचे आहे.    - पूजा खेडकर, प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी

टॅग्स :Puneपुणेias pooja khedkarपूजा खेडकर