शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

पूजा खेडकरच्या आईने बंगल्यासमोरील फुटपाथवर केले अवैध बांधकाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 8:02 AM

३ फूट रुंद आणि साठ फूट लांब जागा बळकावली : सात दिवसांत अनधिकृत बांधकाम हटवा, अन्यथा कारवाईचा महापालिकेचा इशारा

पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर व त्यांच्या कुटुंबीयांचे नवनवे कारनामे रोज उघडकीस येऊ लागले आहेत. पूजा यांच्या आई मनोरमा यांनी बाणेर येथील रो-हाऊसच्या सीमा भिंतीला लागून फुटपाथवर तीन फूट रुंद, दोन फूट उंच आणि साठ फूट लांबीचे अवैध बांधकाम केल्याचे समोर आले आहे. हे अनधिकृत बांधकाम येत्या सात दिवसांत काढून घ्या, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी नोटीस महापालिकेने त्यांच्या  घरावर चिकटवली आहे.  

नॅशनल हाैसिंग सोसायटीमधील प्लॉट क्रमांक ११२ मध्ये पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर रो-हाऊसमध्ये राहतात. त्यांनी रो-हाऊसच्या सीमा भिंतीला लागून फुटपाथवर तीन फूट रुंद, दोन फूट उंची आणि साठ फूट लांबीचे बांधकाम केले आहे. हे बांधकाम अनधिकृत असून ते येत्या सात दिवसांच्या आतमध्ये स्वखर्चाने काढून घेण्यात यावे, अन्यथा पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत काढून टाकले जाईल, अशा आशयाची नोटीस पालिकेच्या अधिकाऱ्यांनी भिंतीवर चिकटवली आहे. 

ओबीसी कोट्यातून केले एमबीबीएस

पूजा खेडकर यांनी पुण्यातील काशिबाई नवले मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली आहे. त्यासाठी सन २००७ मध्ये त्यांनी ओबीसीतील भटक्या जमाती-३ (एनटीसी-३) या कोट्यातून प्रवेश घेतला होता.

विशेष म्हणजे, वडील आयएएस अधिकारी असताना त्यांनी नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेट जोडले होते. त्यावेळी नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे ज्यांचे वार्षिक उत्पन्न साडेचार लाखांच्या आत हाेते त्यांनाच मिळत हाेते.

खेडकर यांनी आयएएस हाेण्यासाठी यूपीएससीकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले आहे. त्या काेट्यातून त्यांना नाेकरीही मिळाली; परंतु वैद्यकीय प्रवेश घेताना अपंगत्व प्रमाणपत्र दिलेले नाही. मग यूपीएससीच्या वेळीच त्यांना अपंगत्व आले होते का ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पूजा खेडकर यांनी सन २००७ मध्ये आमच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश घेतला हाेता. त्यावेळी सीईटीद्वारे प्रवेश देण्यात आला हाेता. त्यावेळी त्यांना एनटीसी-३ या प्रवर्गातून प्रवेश दिला आहे, तसेच त्यावेळचे नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे नगरचे एसडीओ यांचे आहे.  

- डाॅ. अरविंद भाेरे,

वैद्यकीय संचालक, काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय, नऱ्हे