शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पूजाची मृत्यूशी झुंज अखेर संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 2:39 AM

रेल्वे अपघातात जखमी झालेल्या पूजाची मृत्यूशी झुंज अखेर संपली. आठवडाभरापूर्वी रेल्वे अपघातात ती जखमी झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्ककेडगाव : रेल्वे अपघातात जखमी झालेल्या पूजाची मृत्यूशी झुंज अखेर संपली. आठवडाभरापूर्वी रेल्वे अपघातात ती जखमी झाली होती.पूजा नारायण डोळे (वय २१ वर्षे) असे तिचे नाव आहे. मांजरी येथील वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पदव्युत्तर महाविद्यालयाचा पहिला दिवस तिचा अखेरचा दिवस ठरला. गेल्या आठवड्यात सोमवारी (दि. १७) पूजा महाविद्यालयाचा पहिला दिवस उरकून मांजरी रेल्वेस्थानकावर आली. दुपारी पावणेतीनच्या दरम्यान पुण्यावरून दौंडकडे जाणाऱ्या डेमूमध्ये केडगावला जाण्यासाठी चढत असताना पूजा पाय घसरून पडली. या स्थानकावरील प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याने तिच्या पायाला व घोट्याला मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तत्काळ शालेय विद्यार्थ्यांनी व युवकांनी तिला लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले. पायावर व गुडघ्यावर शस्रक्रिया करुनसुद्धा ती उपचारास प्रतिसाद देत नव्हती. अखेर आज रविवारी (दि. २३) सकाळी १0 वाजण्याच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. त्यानंतर शवविच्छेदनानंतर सायंकाळच्या सुमारास मृतदेह केडगाव येथे आणण्यात आला. अंत्यदर्शनानंतर तिचे मूळ गाव गुळज (ता. गेवराई बीड) येथे अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यात आला. पूजा लहानपणापासून हुशार व मनमिळावू स्वभावाची होती. जवाहरलाल विद्यालयाचे उपशिक्षक नारायण डोळे यांची ती कन्या होती. तिच्या पाठामागे आई, वडील व एक छोटा असा परिवार आहे.नुकसानभरपाईची मागणीपूजाचा मृत्यू डेमू गाडी चढताना झाला आहे. विशेष म्हणजे मांजरी येथील प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याने ती पडल्याने गंभीर जखमी झाली. तिच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.