शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

दि पूना मर्चंटस् चेंबरची यंदा ही ‘रास्त भावात लाडू व चिवडा’ विक्री; सलग २८ वर्षे राबविला जातोय उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 6:45 PM

सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने गेल्या २८ वर्षांपासून ‘रास्त भावात लाडू व चिवडा’ विक्रीचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देदि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर बाजारभावापेक्षा निम्या दरात चिवडा व लाडूची विक्री केली जात असल्याचे ओस्तवाल यांनी सांगितले.१४ आॅक्टोबर पासून चिवडा-लाडूची विक्री करण्यात येणार आहे.

पुणे : सर्वसामान्य व गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी व सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने गेल्या २८ वर्षांपासून ‘रास्त भावात लाडू व चिवडा’ विक्रीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडेल या दरात ही विक्री केली जाते. यंदा देखील दिवाळीच्या मुहूर्तांवर १४ आॅक्टोबर रोजी सकाळी १०  वाजता ओसवाल बंधू समाज कार्यालय येथे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते व पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थित ही विक्री सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर बाजारभावापेक्षा निम्या दरात चिवडा व लाडूची विक्री केली जात असल्याचे ओस्तवाल यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेसाठी माजी अध्यक्ष वालचंद संचेती, उपाध्यक्ष जवाहलाल बोथरा, माजी अध्यक्ष व नगरसेवक प्रविण चोरबेले, अशोक लोढा, विजय मुथा, देवेंद्र अग्रवाल उपस्थित होते. यावेळी ओस्तवाल यांनी सांगितले की, पोहे-खोबरे याचे दर वाढले व जीएसटीमुळे दरवाढ झाल्यानंतर देखील चेंबरच्या वतीने गत वर्षीच्या तलुनेत यंदा कमी दरामध्ये हा चिवडा व लाडूची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांना परवडावे यासाठी लाडू व चिवडा दोन्ही  १०५ रुपये प्रति किलो दराने विक्री करण्यात येणार आहे. सलग पंधरा दिवस तब्बल ५०० कर्मचारी रात्र-दिवस काम करून सुमारे ८५ हजार किलो पेक्षा अधिक चिवडा व लाडू तयार करतात. या उपक्रमाची ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद देखील झाली आहे.याबाबत बोथरा यांनी सांगितले, की कोणत्याही स्वरुपाची शासकीय मदत न घेता चेंबरचे सदस्य स्वत: बाजारात जाऊन उत्तम दर्जाची हरभरा डाळा, बेसन, साखर, खोबरे, तेल, तुप सर्व मालांची खरेदी करतात. तेसच चिवडा बनविणा-या कर्मचा-यांची आरोग्य तपासणी केल्यानंतरच त्यांना या कामासाठी घेतले जाते. अत्यत रास्त भाव आणि उत्कृष्ट पॅकिंगमुळे पूना मर्चंटस्चा चिवडा-लाडू सर्वसमान्य पुणेकरांकडून दर वर्षी अत्यंत उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे बोथरा यांनी सांगितले.पुण्यात ९ केंद्रांवर होणार चिवडा-लाडू विक्रीपुणेकरांच्या सोयीसाठी दि पूना मर्चंटस् चेंबरच्या रास्त दरातील चिवडा-लाडूची पुण्यातील विविध नऊ ठिकाणी विक्री करण्यात येणार आहे. यामध्ये मार्केट यार्ड येथील दि पूना मर्चंटस् चेंबरचे कार्यालय, शंकरशेठ रोडवरील ओसवाल बंधू समाज कार्यालय, कोथरूड येथील जयश्री आॅईल अ‍ॅण्ड शुगर डेपो, हडसर येथे जगदीश ट्रेडिंग कंपनी, कर्वेनगरमध्ये आगरवाल प्रॉडक्ट, टिळक रोडवर नरेंद्र इलेक्ट्रीकल, सिंहगड रोड येथे भगत टेड्रर्स, बिबवेवाडीला आझाद मित्र मंडळ येथे १४ आॅक्टोबर पासून ही विक्री करण्यात येणार आहे.

टॅग्स :Puneपुणेdiwaliदिवाळी