भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध पार पडली. या वेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सोपान खटाटे, वंदना शांताराम खटाटे, सोनाली संतोष झेंडे, अमर विष्णू झेंडे, शरद सदाशिव झेंडे हे उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या विकासकामांना अधिकचे प्राधान्य देणार असल्याचे सरपंचपदी पूनम झेंडे या वेळी सांगितले. तर उपसरपंच कौशल्या झेंडे म्हणाल्या, ग्रामपंचायतीसाठी विविध विकासकामे केली जाणार असून सर्व वाड्यावस्त्यांना त्याचबरोबर ग्रामस्थांना स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी पॅनलप्रमुख अविनाश झेंडे, पांडुरंग झेंडे, महादेव झेंडे, समीर झेंडे, अमोल झेंडे, तानाजी खटाटे, मुंबईचे नगरसेवक मंगेश गायकवाड, विकास झेंडे, भिकन खटाटे, लालासो खटाटे, विठ्ठल खटाटे, बाळासाहेब पवार, अजित गोळे, रामदास झेंडे आदी उपस्थित होते.
बातमीसोबत फोटो पाठवित आहे.
१० गराडे झेंडेवाडी
निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच पूनम झेंडे व उपसरपंच कौशल्या झेंडे भाजपनेते बाबाराजे जाधवराव व इतर.