निमसाखर : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील निमसाखर ते चौपन्न फाटा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या डागडुजीसाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर होऊनही ठेकेदाराने कामाला गती दिली नाही. त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून बांधकाम विभागनेही याकडे दुर्लक्ष केले आहे.
बावडा - बारामती व इंदापूर - बारामती या दोन समांतर रस्त्याला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांपैकी एक ९ किलोमीटरचा चौपन्न फाटा रस्ता महत्वाचा आणि रहदारीचा. चौपन्न फाटा ते निमसाखर दरम्यान रस्त्याच्या कामाला पावसाळ्याच्या सुरुवातीला सुरुवात झाली. ५४ फाटा ते बोंद्रे वस्ती जवळ रस्त्याचे निकृष्ट कच्चे डांबरी काम झाले. सध्या करण्यात आलेल्या कच्चे डांबरीकरण केलेल्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून रस्ताला जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत.रस्त्यावर साईट पट्टया ही गायब झालेल्या आहेत.मात्र या रस्त्याचे उद्घाटन होऊन सहा महिने उलटले तरी सध्या संबंधित ठेकेदाराने रस्ताच्या कडेला मागील काही महिन्यापूर्वी खडी चे मोठे ढिग ठिकठिकाणी टाकले आहेत.मात्र अद्यापही या रखडलेल्या कामाला सुरुवात झाली नाही. रस्तावर मोठ मोठे खड्डे आणि रस्ताच्या कडेला टाकलेल्या खडीमुळे वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.
आंदोलनाचा इशारा
ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे चौपन्न फाटा रस्त्याची डागडुजी झाली नाही. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे बाधंकाम विभगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन ठेकेदारावर कारवाई करावी तसेच रस्त्याच्या डागडुजीला तत्कळा सुरुवात करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निमसाखर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गोविंद रणवरे, नीरा भीमाचे संचालक भागवत गोरे, माजी उपसरपंच अनिल बोंद्रे यांसह स्थानिकांनी दिला आहे.
कोट...............
चौपन्ना फाटा रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग भिगवण अंतर्गत येत आहे. या कामासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या असुन काही तांत्रिक अडचणींमुळे रखडलेले काम लवकरच पूर्ण करण्यात येईल.
मिलींद बारभाई, बांधकाम विभाग पुणे
फोटो
०४ निमसाखर
निमसाखर ते चौपन्न फाटा रस्त्याची झालेली दुरावस्था.