गायकवाडवस्ती पासून ते पानमळा-फरतडेवस्ती मार्गे डोरजे वस्तीपर्यंत हा दुरुस्त व्हावा, यासाठी खोर ग्रामपंचायतीकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. मागील काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे मुरुमीकरण करण्यात आले होते. मात्र, सातत्याने या रस्त्यावर रहदारी असल्याने हा रस्ता उखडला गेला आहे. हा जवळपास ३ किमी रस्ता असून जवळपास १५० लोकसंख्या असलेली लोकवस्ती मधील ग्रामस्थ या रस्त्याने ये-जा करीत असतात. मालवाहतूक गाडी शेतात आणण्यासाठी मोठी कसरत या रस्त्याने करावी लागत आहे. निवडणुका आल्या की केवळ मतांचे राजकारण करून आम्ही तुम्हाला रस्ता करून देऊ असे कित्येकदा अश्वासन देण्यात येत असते. मात्र प्रत्यक्षात रस्ता काही होत नाही.
खोर परिसरातील ईजुळा, खडक वस्ती, हरिबाचीवाडी या रस्त्यांची देखील दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांच्या कामासाठी दौंड पंचायत समिती व जिल्हा परिषद विभागाने लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.
या परिसरातील अनेक वाड्या-वस्त्यांकडे जाण्यासाठी दर्जेदार रस्ते नसून अनेक ठिकाणी मोठं-मोठे खड्डे तर कोठे खडी उखडलेली पाहावयास मिळत आहे. मात्र या रस्त्याच्या दुरवस्थेकडे ना कोणी प्रशासन विभाग व ना कोणी राजकीय पुढारी लक्ष देण्यास तयार नाही.
पानमळा-फरतडेवस्ती रस्त्यावर फरतडेवस्ती तलाव आहे. शेतकऱ्यांना पाणी आणणे तसेच शेतात जाण्यासाठी हा नजीकचा मार्ग असून हा रस्ता डांबरीकरण होणे गरजेचे आहे. आता आश्वासनाची पूर्तता बास झाली आहे. आता प्रत्यक्षात या आमचा गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला रस्ता करून आम्हाला न्याय द्यावा.
--------- जालिंदर डोंबे, शेतकरी खोर
३०खोर
गायकवाडवस्ती पासून ते पानमळा-फरतडेवस्ती मार्गे डोरजे वस्ती रस्त्याची झालेली बिकट अवस्था.