पिंपरी पेंढार: येथील ग्रामपंचायतीने गावठाणातील रस्ता दुरुस्त करण्यासाठी उकरला होता. मात्र, दोन वर्षे उलटली तरी रस्त्याची साधी डागडुजीही झाली नाही.खारवणे वस्तीतील रस्त्याचीही दुरवस्था झाल्याने वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांतून होत आहे.
जुन्नर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे म्हणून पिंपरी पेंढार गाव ओळखले जाते, या गावातील गावठाणातील रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. दोन वर्षापूर्वी रस्ता करायचा आहे असे सांगून ग्रामपंचायतीने खोदकाम केले. मात्र, त्यानंतर आजपर्यंत रस्ताच तयार झाला नाही. नागरिकांनी वेळोवेळी यासंदर्भात ग्रामपंचायतीला कळवले. पण या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. रस्त्यावर पाणी साचले असून, चिखल तयार झाला आहे. त्यामुळे या मार्गाचा वापर करणे नागरिकांसाठी जिकिरीचे झाले आहे. खारवणे वस्तीतही अशाच प्रकारे रस्त्याची दुरवस्था झालेली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हा रस्ता होणार की नाही आणि आता याबाबत दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न पडला आहे.
कोट.......
गावठाणातील रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. वर्क ऑर्डर मिळाली की तत्काळ काम सुरू करण्यात येईल.
सुरेखा वेठेकर, सरपंच, पिंपरी पेंढार
११ पिंपरी पेंढार
गावठाण हद्दीतील रस्त्याची झालेली अवस्था.
११ पिंपरी पेंढार १
खारावणे येथील रस्त्याची दुरवस्था.
110921\img-20210911-wa0167.jpg
आदर्श ग्रामपंचायत पिंपरी पेंढार ता. जुन्नर येथील दोन वर्षापासुन रस्त्याची दयनीय अवस्था