--
शिवापूर : शिवापूर (ता.हवेली) ते कुसगांव (ता.भोर) या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याची संबंधित प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अक्षरशः चाळण झाली असून स्थानिकांसह पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शिवापूर (ता.हवेली) ते कुसगांव (ता.भोर) हा रस्ता दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता आहे, त्यामुळे या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. भोर व वेल्हा तालुक्यातील काही गावांमध्ये लवकर पोहोचण्यासाठी हा मार्ग खूप सोपा मार्ग आहे. त्यातच हवेली तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातून राजगड, तोरणा, रोहिडेश्वर या गडकिल्ल्यांना जाणारा एकमेव रस्ता असल्याने दुर्गप्रेमी या रस्त्याचा वापर करतात मात्र सध्याची परिस्थिती पाहिली तर याची चाळण झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे पर्यटक ह्या मार्गाचा अवलंब करताना दिसत नाही. परिणामी रस्त्यादरम्यान असलेल्या व्यावसायिकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.
या दरम्यानच्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र तशी मागणी करूनही सदर रस्ता केला जात नाही* असे कुसगांव (ता.भोर) येथील नागरिकांनी सांगितले.
--
रस्ता कोणत्या तालुक्यात हे कोडेच
या दरम्यानचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नक्की भोर तालुका की वेल्हा तालुका विभागात येतो की अजून कोणत्या तालुक्यात हे समजण्या पलीकडे आहे, कारण वेल्हा व भोर तालुका सार्वजनिक बांधकाम विभाग सदर रस्ता आमच्या तालुक्यात येत नसल्याचे सांगत आहेत. यावरून तेथील अधिकाऱ्यांना या रस्त्याची माहिती आहे? की नाही* हे यावरून स्पष्ट होत आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जयंत काकडे यांना विचारले असता ते म्हणाले की, कोविड-१९ या महामारीच्या संकटामुळे या दरम्यानच्या रस्त्याला निधी उपलब्ध झाला नाही. मात्र तरीही संबंधित ठेकेदाराला सदर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सांगितले आहे. खड्डे बुजविण्याचे काम येत्या दोन तीन दिवसात सुरू केले जाणार आहे.
-
फोटो