अनेक वेळा या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी चोपडज व वाकी येथील ग्रामस्थानी केली. परंतु डागडुजी करूनही आज जैसे थे परिस्थिती पाहावयास मिळत आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेळोवेळी रस्त्यासाठी होणाऱ्या लाखो रुपयांचे निधी जर अशाप्रकारे खर्च होत असेल तर, हा जनतेच्या पैशाचा अपव्यय तर होत नाही ना ? असा संशय ही निर्माण होताना दिसत आहे.या रोडला साईड पट्ट्या राहिल्या नाहीत, दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते त्यानंतर दोन महिन्यापूर्वी डागडुजी करण्यात आली. परंतु रस्त्याला दोन महिन्यातच खड्डे पडले. हा रस्ता जागोजागी खचला असून या रस्त्याचे काम लवकर करण्यात यावे, अशी मागणी चोपडज व वाकी ग्रामस्थानी केली आहे.
वाकी चोपडज रस्त्याची झालेली दुरवस्था.
१३०३२०२१-बारामती-०५