पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघात मतदार चिठ्ठ्या (वोटर स्लिप) वाटपाचे काम सुरू झाले आहे. पण वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात वोटर स्लिप्स वाटपासाठी ५५३ कर्मचा०यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण यामध्ये अत्यल्प स्लिप्स वाटप करणारे एकूण ५७ बूथ लेव्हल ऑफिसर यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या आहेत. तर तीन कर्मचा०यांनी एकाही वोटर स्लिपचे वाटप केले नाही. त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
लोकशाही व्यवस्थेने प्रदान केलेला मतदानाचा हक्क प्रत्येक मतदाराला बजावता यावा, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग यंदा कमालीचा आग्रही आहे. आता वोटर स्लिपही घरपोच मिळणार असल्याने मतदारांना आपले नाव, मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदार याद्या चाळण्याची गरज भासणार नाही. आपले मतदान कोणत्या केंद्रावर आणि कोणत्या खोलीमध्ये होणार हे देखील मतदारांना घरबसल्या माहिती मिळणार आहे. यादीमध्ये नाव असलेल्या प्रत्येक मतदारापर्यंत वोटर स्लिप पोहोचेल असे नियोजन करण्यात आले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान आहे. मतदारसंघात मतदार चिठ्ठ्या (वोटर स्लिप) वाटपाचे काम सुरू झाले आहे. पण वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात वोटर स्लिप्स वाटपासाठी ५५३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण यामध्ये अत्यल्प स्लिप्स वाटप करणारे एकूण ५७ बूथ लेव्हल ऑफिसर यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या आहेत. तर तीन कर्मचाऱ्यांनी एकाही वोटर स्लिपचे वाटप केले नाही. त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.