मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 12:31 PM2024-06-01T12:31:02+5:302024-06-01T12:31:43+5:30

Porsche Car Accident: "आम्ही सारखे सारखे कॅमेऱ्यासमोर येत नाही, म्हणजे, यात  कुणाला तरी लपवाछपवी करण्याचं काम चाललयं, तर हे अजिबात नाही."

Porsche Car Accident The son, the father and the father's father have also been arrested, Action is being taken against those who are guilty Ajit Dada spoke clearly | मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले

मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले

पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाताची सध्या संपूर्ण राज्यभरात चर्चा सुरू आहे. यातच आता, "या प्रकरणात रोज जस-जसा तपास पुढे जात आहे आणि जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. आधी मुलाला सोडले होते. मात्र नंतर त्यालाही अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्या बापाला अटक करण्यात आली, नतंर त्याच्या बापाच्या बापालही अटक करण्यात आली," असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ते पुण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.

विरोधक काय आरोप करत आहेत, हा त्यांचा अधिकार -
अजित पवार म्हणाले, "चौकशीमध्ये ब्लड सॅम्पल बदले असल्याचे समोर आले. ते ब्लड कुणाचे होते काय होते? यासंदर्भात मला माध्यमांना आणि माध्यमांच्या माध्यमाने राज्यातील तमामम जनतेला आणि तमाम पुणेकरांना सांगायचे आहे की, आम्ही सारखे सारखे कॅमेऱ्यासमोर येत नाही, म्हणजे, यात  कुणाला तरी लपवाछपवी करण्याचं काम चाललयं, तर हे अजिबात नाही. विरोधक याप्रकरणात काय आरोप करत आहेत, हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, ही घटना घडल्यापासून आजपर्यंत रोज एक एक दिवस जस-जसा पुढे जातोय, तस-तसे या चौकशीत जे कुणी दोषी आढळत आहे, त्यांच्यावर कारवाई चाललेली आहे," असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

त्या दिवशी स्थानिक आमदाराची माणसं तेथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत होती. यामुळे त्यांच्याकडे शंकेने बघितले जात आहे, असे विचारले असता, पवार म्हणाले, "चौकशी करू द्याना... आमदाराच्या भागात जर काही घडलं, तर आमदाराला रात्री अपरात्री तिथे जावे लागते. गेल्यावेळी सुनील टिंगरे यांच्या भागात स्लॅब कोसळला होता आणि त्यात काही लोकांचा मृत्यू झाला होता. तो ताबडतोब तेथे पोहोचला आणि लोकप्रतिनिधी नात्याने जे काही करायचे ते करतात. पुण्यात काही घटना गडली की, पुण्यातील बहुतेक लोकप्रतिनिधी त्यांच्या कार्यकर्त्यांसह ताबडतोब पुढे येतात आणि मदत करण्याचा प्रयत्न करतात. चौकशी करण्याचा प्रयत्न करतात आणि जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाी करण्यास सांगतात." 

मी स्वत: सांगतो की, संबंधितांना टायरमध्ये घ्या अन्... - 
"ही घटना रात्री उशीरा घडली, त्यांना कुणाचा तरी फोन आला आणि ते पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. तेथे त्यांनी सर्वकाही बघितले. त्याने कुठेही कुणालाही पाठिशी घाला असे सांगितलेले नाही. आता काहीजण तर माझ्यावर घसरले. कार्यकर्ता चुकला आणि माझाजवळ आला, तरी मी तो चुकीचा वागलेला असेल, त मी स्वत: सांगतो की संबंधितांना टायरमध्ये घ्या आणि जी काही नियमाने कारवाई असेल ती करा," असेही पवार म्हणाले.

Web Title: Porsche Car Accident The son, the father and the father's father have also been arrested, Action is being taken against those who are guilty Ajit Dada spoke clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.