शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 12:31 PM

Porsche Car Accident: "आम्ही सारखे सारखे कॅमेऱ्यासमोर येत नाही, म्हणजे, यात  कुणाला तरी लपवाछपवी करण्याचं काम चाललयं, तर हे अजिबात नाही."

पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाताची सध्या संपूर्ण राज्यभरात चर्चा सुरू आहे. यातच आता, "या प्रकरणात रोज जस-जसा तपास पुढे जात आहे आणि जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. आधी मुलाला सोडले होते. मात्र नंतर त्यालाही अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्या बापाला अटक करण्यात आली, नतंर त्याच्या बापाच्या बापालही अटक करण्यात आली," असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ते पुण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.

विरोधक काय आरोप करत आहेत, हा त्यांचा अधिकार -अजित पवार म्हणाले, "चौकशीमध्ये ब्लड सॅम्पल बदले असल्याचे समोर आले. ते ब्लड कुणाचे होते काय होते? यासंदर्भात मला माध्यमांना आणि माध्यमांच्या माध्यमाने राज्यातील तमामम जनतेला आणि तमाम पुणेकरांना सांगायचे आहे की, आम्ही सारखे सारखे कॅमेऱ्यासमोर येत नाही, म्हणजे, यात  कुणाला तरी लपवाछपवी करण्याचं काम चाललयं, तर हे अजिबात नाही. विरोधक याप्रकरणात काय आरोप करत आहेत, हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, ही घटना घडल्यापासून आजपर्यंत रोज एक एक दिवस जस-जसा पुढे जातोय, तस-तसे या चौकशीत जे कुणी दोषी आढळत आहे, त्यांच्यावर कारवाई चाललेली आहे," असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

त्या दिवशी स्थानिक आमदाराची माणसं तेथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत होती. यामुळे त्यांच्याकडे शंकेने बघितले जात आहे, असे विचारले असता, पवार म्हणाले, "चौकशी करू द्याना... आमदाराच्या भागात जर काही घडलं, तर आमदाराला रात्री अपरात्री तिथे जावे लागते. गेल्यावेळी सुनील टिंगरे यांच्या भागात स्लॅब कोसळला होता आणि त्यात काही लोकांचा मृत्यू झाला होता. तो ताबडतोब तेथे पोहोचला आणि लोकप्रतिनिधी नात्याने जे काही करायचे ते करतात. पुण्यात काही घटना गडली की, पुण्यातील बहुतेक लोकप्रतिनिधी त्यांच्या कार्यकर्त्यांसह ताबडतोब पुढे येतात आणि मदत करण्याचा प्रयत्न करतात. चौकशी करण्याचा प्रयत्न करतात आणि जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाी करण्यास सांगतात." 

मी स्वत: सांगतो की, संबंधितांना टायरमध्ये घ्या अन्... - "ही घटना रात्री उशीरा घडली, त्यांना कुणाचा तरी फोन आला आणि ते पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. तेथे त्यांनी सर्वकाही बघितले. त्याने कुठेही कुणालाही पाठिशी घाला असे सांगितलेले नाही. आता काहीजण तर माझ्यावर घसरले. कार्यकर्ता चुकला आणि माझाजवळ आला, तरी मी तो चुकीचा वागलेला असेल, त मी स्वत: सांगतो की संबंधितांना टायरमध्ये घ्या आणि जी काही नियमाने कारवाई असेल ती करा," असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातState Governmentराज्य सरकार