शिरुर वार्ता हर : शिरूर शहरालगत असणाऱ्या एका रहिवाशी मुलींच्या शाळेतील ४८ मुली व नऊ शिक्षक या अशा ५७ जणांची कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे .
याबाबत शिरूर नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी माहिती दिली आहे .शिरूर शहरालगत असणाऱ्या या शाळेमध्ये एक कोरोना रुग्ण असल्याची माहिती नगरपरिषदेला
समजली या समजलेल्या माहितीनुसार तो रुग्ण आढळल्याने या शाळेतील
मुलींची ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातुन .
अंटीजेन टेस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या मुलींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या कोरोना झालेल्या मुलींनां शाळेतील एक शिक्षक बाहेर गावाहुन येत असल्याने
प्रार्दुभाव झाल्याची माहिती समजली आहे. या मुलींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांची व शिक्षकांची शासकीय रुग्णालयामार्फत तपासणी करून औषध उपचार सुरु करण्यात आले तर त्रास होत असलेल्या एका मुलींवर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत .तसेच शहरातील
सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या जेवण्याची व्यवस्था केली असुन या परिसरात नगरपरिषदेचा वतीने फवारणी करण्यात आली
असल्याची माहीती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली .