पुणे : हेल्मेट सक्तीला काही संघटनांकडून विराेध हाेत असताना पुणेकरांनी मात्र हेल्मेट सक्ती स्विकारल्याचे चित्र आहे. पुणे वाहतूक पाेलिसांनी केलेल्या पाहणीनुसार एकूण दुचाकीचालकांपैकी 66 टक्के दुचाकीचालक आता हेल्मेट वापरु लागले आहेत. त्यामुळे पाेलिसांनी केलेली जनजागृतीचा सकारात्मक परिणाम हाेतत असल्याचे दिसत आहे.
गेल्या एक जानेवारीपासून पुण्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली. सर्वाेच्च न्यायलयाच्या वाहतूकीच्या नियमाबाबत स्पष्ट सूचना असल्याने या एक तारखेच्या आधी सुद्धा हेल्मेट न वापरनाऱ्यांवर सीसीटिव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत हाेती. परंतु एक तारखेपासून ही कारवाई अधिक तीव्र करत विविध ठिकाणी उभ्या असणाऱ्या वाहतूक पाेलिसांनी देखील कारवाईला सुरवात केली. या कारवाईला आणि हेल्मेट सक्तीला काही राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी विराेध केला. परंतु पाेलिसांनी ही कारवाई पुढेही चालूच ठेवली. या कारवाई बराेबरच दुचाकी चालकांचे समुपदेशन करण्यावर देखील पाेलिसांनी भर दिला. गेल्या काही महिन्यांपासून रॅली आणि समुपदेशनाच्या माध्यमातून पाेलिसांनी वाहतूक नियमांचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले. या आधी सुद्धा अनेकदा हेल्मेट सक्ती करण्यात आली हाेती. परंतु दरवेळेस ती मागे घेण्यात आली. यंदा मात्र पाेलिसांनी कारवाईचा धडाका लावल्याने पुणेकर नरमल्याचे चित्र आहे. हेल्मेट हे सुरक्षेसाठी महत्त्वाचे असल्याचे आता पुणेकरांना पटू लागले आहे.
पाेलिसांनी 4 जानेवारी राेजी शहरातील विविध भागांमध्ये हेल्मेट परिधान केलेल्या व न केल्ल्या नागरिकांचा सर्वे केला. त्यातून 66 टक्के नागरिक हे आता हेल्मेट वापरत असल्याचे समाेर आले आहे. सीसीटिव्हीच्या माध्यमातून सिग्ननलला उभ्या असलेल्या वाहनचालकांची पाहणी करण्यात आली. त्यात सिग्नलला उभ्या असलेल्या वाहनचालकांचे फाेटाे घेण्यात आले. खडक वाहतूक विभागाने घेतलेल्या फाेटाे मध्ये 30 वाहनचालकांपैकी 25 वाहनचालकांनी हेल्मेट घातले हाेते. समर्थ वाहतूक विभागाने घेतलेल्या फाेटाेत 21 दुचाकीचालकांपैकी 18 जणांनी हेल्मेट घातले हाेते. तर काेरेगाव पार्क येथे 103 वाहनचालकांपैकी 83 आणि हडपसर येथे 83 जणांपैकी 67 जणांनी हेल्मेट घातल्याचे दिसून आले आहे. अशीच पाहणी शहरातील सर्वच मुख्य चाैकांमध्ये करण्यात आली.