पुणे: पुणे व्यापारी महासंघ व पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने नूतन मराठी विद्यालय येथे वय वर्षे ४५ च्या वरील दुकानातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी विनामूल्य लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आज ५०० हून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले.
पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगारांचे लसीकरण करून घ्या. असे आवाहन पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेहचंद रांका व सचिव महेंद्र पितळीया यांना भेटी दरम्यान केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत व्यापारी महासंघाने आपल्या सदस्यांना लसीकरणाला प्रवृत्त करत आगाऊ नोंदणी करून घेतली होती. प्रत्येकाचे रीतसर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घेण्यात आले होते. लसीकरण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीस डॉक्टरांच्या निगराणी खाली अर्धा तास थांबवून अल्पोपहार चहा देऊन सोडण्यात आले.
सध्या लसींचा तुटवडा जाणवत आहे. लसी उपलब्ध झाल्यानंतर पुढील लसीकरण शिबीर घेण्यात येईल. असे व्यापारीमहासंघाचे अध्यक्ष फतेहचंद रांका यांनी जाहीर केले. सदस्य व कामगारांनीं मोठ्या संख्येने नावनोंदणी करावी. ज्यामुळे नियोजन करणे सोपे जाईल. असे आवाहन सचिव महेंद्र पितळीया यांनी केले. याप्रसंगी पुणे महापालिका सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ .वैशाली जाधव, वॉर्ड मेडिकल ऑफिसर डॉ .गोपाळ उजवानकर, राहूल हजारे ,मिलिंद शालगर ,नितीन काकडे, कुमार भोगशेट्टी, नितीन पोरवाल आदी उपस्थित होते.