शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पॉझिटिव्हिटी रेट ४ टक्क्यांहून कमी, निर्बंधांतून सूट मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 4:10 AM

पॉझिटिव्हिटी रेटच्या बाबतीतही हा आठवडा अत्यंत दिलासा देणारा ठरला आहे. ७-१४ जून या कालावधीत ४.६७ टक्के, १४-२० जून या ...

पॉझिटिव्हिटी रेटच्या बाबतीतही हा आठवडा अत्यंत दिलासा देणारा ठरला आहे. ७-१४ जून या कालावधीत ४.६७ टक्के, १४-२० जून या कालावधीत ४.८२ टक्के, २१-२७ जून या कालावधीत ४.७० टक्के, २८ जून- ४ जुलै या कालावधीत ५.३८ टक्के, ५ ते ११ जुलै या कालावधीत ५.३७ टक्के, १२ ते १८ जुलै या कालावधीत ४.१६ टक्के हा पॉझिटिव्हिटी रेट होता. या आठवड्यातील पॉझिटिव्हिटी रेट ४ टक्कयांच्याही खाली गेला आहे.

१९ ते २५ जुलैै या कालावधीत दररोजच्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. आठवड्यात १८३२ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले, तर १९५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. शहरातील दररोजच्या मृत्यूची संख्याही दररोज ५ ते ७ इतकी कायम आहे. आठवड्याभरात ४१ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला.

आॅगस्टअखेर तिसरी लाट येण्याचा धोका प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने निर्बंध आणखी शिथिल करण्याचा विचार सुरु आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली असली तरी नागरिकांनी निष्काळजी न होता घराबाहेर पडताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे आणि तिसरी लाट येण्यापासून रोखण्यास शासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले जात आहे.

------

कोरोनातून दिलासा, मात्र चिंता व्हायरल इन्फेक्शनची

गेले दोन आठवडे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असताना दिसत आहे. रुग्णसंख्याही आटोक्यात येत आहे. कोरोनाच्या संकटातून दिलासा मिळत असताना हवामानातील बदलामुळे फ्लूसदृश लक्षणांनी मात्र डोके वर काढले आहे. आबालवृध्दांमध्ये सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप ही लक्षणे दिसून येत आहेत. गेल्या आठवड्याभरात इतर विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याचे निरिक्षण वैैद्यकतज्ज्ञांनी नोंदवले आहे. पाणी उकळून प्यावे, उघड्यावरचे पदार्थ टाळावेत, ताज्या भाज्या आणि फळे खावीत, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

----------------------

महिन्याभरातील स्थिती :

आठवडा चाचण्या रुग्ण पॉझिटिव्हीटी

२८ जून-४ जुलै ३९,८८८ २१४८ ५.३८

५ - ११ जुलै ३८,५४३ २०७२ ५.३७

१२- १८ जुलै ४४,६९५ १८६१ ४.१६

१९-२५ जुलैै ५३,९५३ १८३२ ३.३९

-----------------