कोरेगाव भीमा (पुणे) : पेरणे (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना देण्याच्या कार्यक्रमावेळी मागील वर्षी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर २२ डिसेंबर ते १२ जानेवारी या काळात विजयस्तंभ व परिसरातील जागेचा ताबा राज्य शासनाने देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यानंतर संबंधित जागा मूळ स्थितीत परत करावी लागणार आहे.तसेच कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी विजयस्तंभासह लोणीकंद, पेरणे, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापूर परिसरात मोबाइल- इंटरनेट सेवेवर प्रतिबंध असल्याचे शिक्रापूरचे पो. निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.१ जानेवारीला पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक पेरणे येथील टोलनाका ते शिक्रापूरदरम्यान बंद राहील. पाच हजार पोलीस कर्मचारी, ४२५ अधिकारी यांसह एसआरपीएफ, होमगार्ड असा मोठा पोलीस बंदोबस्त २९ डिसेंबरपासून तैनात राहणार आहे.जिल्हा प्रशासन व पोलीस दलामार्फत परिसरात २५० पेक्षा जास्त बैठका घेण्यात आल्या. ४४ हॉटेल व स्नॅक्स सेंटर व्यावसायिकांंना पोलीस संरक्षण दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या बांधवांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे.
कोरेगाव भीमा परिसर शासनाच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 5:58 AM